विशाल पुजारी, कोल्हापूर: कर्नाटकमध्ये महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसवर हल्ला करत काळे फासल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी बसला काळे फासत चालकाला मारहाण केल्याने सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. या प्रकारानंतर महाराष्ट्र- कर्नाटक सीमावादाचा तणाव आणखी वाढला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
याबाबत सविस्तर माहिती अशी की, कर्नाटकमध्ये कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी मुजोरी केल्याचा प्रकार समोर आला आहे. पुणे- बेंगलोर महामार्गावरील चित्रदुर्ग इथे हा धक्कादायक प्रकार घडला. याठिकाणी कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी सर्वप्रथम महाराष्ट्रातील एसटीवर हल्ला केला, तसेच काळेही फासले.
यावेळी कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी एसटी महामंडळाच्या चालकाला कन्नड येथे का? अशी विचारणा करत मारहाण केल्याचेही कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी एसटी महामंडळाच्या चालकाला कन्नड येथे का अशी विचारणा करत मारहाणही केली. एसटी महामंडळाच्या चालकाला मारहाण केल्याने त्याला तात्काळ रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.
ट्रेंडिंग बातमी - ABMSS: महाराष्ट्राबाहेर कुठे कुठे झाली अ. भा. मराठी साहित्य संमेलनं? पाहा यादी
या प्रकरणानंतर महाराष्ट्रातील नेत्यांनी संताप व्यक्त केला आहे. या घटनेनंतर शिवसेना ठाकरे गटाने कोल्हापूरमध्ये आंदोलन सुरु केले आहे. तसेच राज्य सरकारनेही याप्रकरणाची दखल घेत कर्नाटकला जाणाऱ्या बसेस तात्पुरत्या थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. याप्रकरणावरुन महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावाद पुन्हा एकदा चिघळण्याची शक्यता आहे.
दरम्यान, कर्नाटकमध्ये महाराष्ट्रातील बसेसवर हल्ला होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी अनेकदा कन्नडिगांची मुजोरी पाहायला मिळाली होती. त्यामुळेच याप्रकरणाने महाराष्ट्रामध्ये संतापाची लाट पाहायला मिळत असून कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी माफी मागावी, अशी मागणीही होत आहे. याबाबत राज्य सरकार काय निर्णय घेते? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.