Nagpur Violence: 'औरंगजेब हा संयुक्तिक मुद्दा नाही..', नागपूर हिंसाचारानंतर संघाचे मोठे वक्तव्य; हिंदू परिषदेचे कान टोचले

RSS On Nagpur Violence: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रचार प्रमुखांनी प्रतिक्रिया दिली आहे. औरंगजेबाचा मुद्दा सध्या संयुक्तिक नाही," असे सुनील आंबेकर यांनी स्पष्ट केले आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

प्रविण मुधोळकर, नागपूर: नागपूरमध्ये सोमवारी झालेल्या हिंसाचार प्रकरणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका वक्तव्याने नवी चर्चा सुरू झाली आहे. "समाजासाठी कोणताही प्रकारचा हिंसाचार चांगला नाही. औरंगजेबाचा मुद्दा सध्या संयुक्तिक नाही, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी सांगितले आहे. आरएसएसच्या या स्पष्टीकरणाने सरकारला तसेच विश्व हिंदू परिषदेचे कान टोचल्याची चर्चा आता सुरु झाली आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

छत्रपती संभाजीनगरजवळ खुलताबाद येथे 380 वर्षांपासून औरंगजेबाची कबर आहे. राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या पुरातत्व खात्याच्या नियमांतून ती बाहेर काढून उखडून टाकावी. अन्यथा,विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते स्वतः ती उखडून अरबी समुद्रात फेकून देतील.. असा इशारा विश्व हिंदू परिषदने सोमवारी दिला होता. त्यानंतर नागपूरमध्ये मोठा हिंसाचार उफाळला. 

विश्व हिंदू परिषदेच्या आंदोलनानंतर औरंगजेबाच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. त्यावर काही मुस्लिम समाजातील प्रतिनिधींनी आक्षेप घेतला होता. मात्र, त्यानंतर हे प्रकरण शांत झाले.  मात्र, त्याच दिवशी संध्याकाळी महाल परिसरात जाळपोळ झाली आणि संपूर्ण प्रकरणाला हिंसक वळण लागले. देशभरात यावर चर्चा सुरू असतानाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रचार प्रमुखांनी प्रतिक्रिया दिली आहे. औरंगजेबाचा मुद्दा सध्या संयुक्तिक नाही," असे सुनील आंबेकर यांनी स्पष्ट केले आहे. 

(नक्की वाचा-  Nagpur Violence: संतापजनक! नागपूरमध्ये हिंसक जमावाने घेरलं अन्... महिला पोलिसांसोबत काय घडलं?)

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने औरंगजेबाच्या मुद्द्यावर प्रतिक्रिया दिल्यानंतर विश्व हिंदू परिषदेकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे.  हिंदू समाज कधीच हिंसेचे समर्थन करत नाही आणि हिंसा करतही नाही. हिंदूंना हिंसक ठरवण्याचा कोणाचाही प्रयत्न चुकीचा आहे. नागपुरातील दंगल ठरवून आणि नियोजनपूर्वक घडवून आणली गेली आहे. त्यामुळे या दंगलीचे कोणीही समर्थन करू शकत नाही, असे विश्व हिंदू परिषदचे महाराष्ट्र क्षेत्र संघटन मंत्री गोविंद शेंडे यांनी म्हटले आहे.

Advertisement

दरम्यान, औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावरून राज्यभर आंदोलन झाले. दरम्यान, नागपुरात दंगल घडल्याने हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. या पार्श्वभूमीवर, 'औरंगजेबाचा मुद्दा सध्या संयुक्तिक नाही,' असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने स्पष्ट केल्यामुळे या वादाला आणखी पेट मिळाला आहे.