
प्रविण मुधोळकर, नागपूर
नागपूरमध्ये सोमवारी रात्री झालेल्या हिंसाचारातील अनेक दंगेखोरांना पोलिसांनी अटक केली. समाजकंटकांना यावेळी दगडफेक केली, अनेक वाहनांची जाळपोळ केली. यामध्ये 33 पोलीस जखमी झाल्याची माहिती आहे. तर काही नागरिक देखील जखमी झाले आहे. याशिवाय आणखी धक्कादायक माहिती देखील समोर येत आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
हिंसाचार करणाऱ्या जमावाने अंधाराचा फायदा घेत एका महिला पोलीस कर्मचाऱ्यांवर विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. चिटणीस पार्क ते सीए रोडकडे जाणाऱ्या रस्त्यावर हिंसा सुरू असताना बंदोबस्तात असणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्यासोबत जमावाने गैरवर्तन करत तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या वर्दीवर हात टाकण्याचा प्रयत्न या दंगेखोरांनी केला.
(नक्की वाचा - Nagpur Violence : नागपूर दंगल रोखता आली असती का? पोलिसांचं नेमकं काय चुकलं?)
दरम्यान महिला कर्मचाऱ्यांनी स्वतःची सुटका केल्याने मोठा अनर्थ ठळला. महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी घडलेल्या प्रकाराबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. त्यानंतर जमावाविरोधात गणेशपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला. अनेक महिला कर्मचाऱ्यांना शिवीगाळ आणि अश्लील शेरेबाजी केल्याचीही माहिती समोर येत आहे.
काही भागात संचारबंदी कायम
सोमवारी झालेल्या हिंसेनंतर परिसरात अजूनही भीतीचं वातावरण आहे. पोलिसांकडून अनेकांची धरपकड सुरु आहे. खबरदारीचा उपाय म्हणून काही भागात आजही संचारबंदी कायम असेल. तर महाल परिसरातील शाळा आजही बंद राहणार आहे. नागपूरच्या 11 पोलीस स्टेशनच्या हद्दीत गेली दोन दिवस संचारबंदी असल्यामुळे नागपूरच्या बाजारपेठेवरही त्याचा परिणाम झाला आहे.
(नक्की वाचा- Nagpur Violence : नागपूर दंगलीच्या कटाची थिअरी खोटी? पोलीस आयुक्तांनी दिली वेगळीच माहिती)
आरोपींना 21 मार्चपर्यंत पोलीस कोठडी
नागपुरातील हिंसाचार प्रकरणात आतापर्यंत 46 आरोपींना अटक करण्यात आली आहे. सर्व आरोपींविरोधात गणेशपेठ आणि तहसील पोलीस स्टेशनमध्ये विविध कलमा अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मंगळवारी रात्री उशिरा या आरोपींना कोर्टाने 21 मार्चपर्यंत पोसीस कोठडी सुनावली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world