Badlapur Politics: बदलापुरात रक्तरंजित राडा! शिवसेना नगरसेवकाकडून भाजप पदाधिकाऱ्याच्या मुलाला मारहाण

शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेवकानी भाजप पदाधिकाऱ्याच्या मुलाला बेदम मारहाण केल्याने हा वाद वाढला आहे. सनी पाटील असं मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Badlaupur Shivsena BJP Dispute:  बदलापुरच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. बदलापूरमध्ये शिवसेना शिंदे गट आणि भारतीय जनतामधील वाद विकोपाला गेला आहे. शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेवकानी भाजप पदाधिकाऱ्याच्या मुलाला बेदम मारहाण केल्याने हा वाद वाढला आहे. सनी पाटील असं मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी नगरसेवक रोहन पाटील, सूरदास पाटील यांच्यासह दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

PM Narendra Modi : वर्षभर सोनं खरेदी करू नका, पंतप्रधान असं का म्हणाले? सोनं खरेदी थांबवली तर काय होईल?

भाजप- शिवसेनेत रक्तरंजित राडा 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, बदलापूरमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेवकाने भाजप पदाधिकाऱ्याच्या मुलाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. सनी पाटील असं मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे. सनी पाटील याचे वडील मारुती पाटील हे पालिका निवडणुकीत नगरसेवक रोहन पाटील यांच्या विरोधात निवडणुकीला उभे होते. तेव्हापासूनच त्यांच्यातला वाद विकोपाला गेला होता. आता एका हळदी समारंभाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने दोन्ही गट पुन्हा आमने-सामने आले. 

Advertisement

त्यावेळी नगरसेवक रोहन पाटील, माजी नगरसेवक सूरदास पाटील सहकाऱ्यांनी आपल्याला बेदम मारहाण केल्याचा आरोप सनी पाटील यांनी केलाय. याप्रकरणी बदलापूर पोलिसांनी नगरसेवक रोहन पाटील, माजी नगरसेवक सूरदास पाटील, प्रथमेश अनंता पाटील, राकेश भगवान पाटील, किशोर भालचंद्र शेलार, जनार्दन धर्मा पाटील यांच्यासह दहा जणांना विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

Palghar news: नियतीचा क्रुर खेळ! लेकीचं लग्न लागणार होतं, तिथे पित्याची अंत्ययात्रा निघाली, हृदयद्रावक घटना