VIDEO: मी स्वप्नातही... छत्रपती शिवाजी महाराजांबाबतच्या वादग्रस्त विधानावर अखेर धीरेंद्र शास्त्रींनी सोडले मौन

Dhirendra Shastri: छत्रपती शिवाजी महाराजांवरील वादग्रस्त विधानावर बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांनी स्पष्टीकरण दिले आहे. श्रद्धा, अंधश्रद्धा आणि लोकसंख्या नियंत्रणावरही त्यांनी भाष्य केलं, नेमके काय म्हणाले? वाचा सविस्तर बातमी...

जाहिरात
Read Time: 3 mins
"Dhirendra Shastri: छत्रपती शिवाजी महाराजांवरील वादग्रस्त विधानावर धीरेंद्र शास्त्रींचे वादग्रस्त विधान"
PTI
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • धीरेंद्र शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवरील वादग्रस्त विधानांवर स्पष्टीकरण दिले
  • शास्त्रींनी स्पष्ट केले की त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला नसून त्यांच्या महानतेचा उल्लेख केला
  • शास्त्रींनी चुकीच्या अर्थाने विधानाचा प्रसार केल्याचे स्पष्टीकरण दिले
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

Dhirendra Shastri: बागेश्वर धामचे पीठाधीश्वर आणि आध्यात्मिक गुरू धीरेंद्र शास्त्री (बागेश्वर बाबा) यांनी रविवारी (26 एप्रिल) नागपुरात छत्रपती शिवाजी महाराजांवरील आपल्या वादग्रस्त विधानांवर स्पष्टीकरण दिले आहे. सोशल मीडियावर माझ्या विधानाचा चुकीचा अर्थ लावला गेल्याचे त्यांनी सांगितलंय. "ज्या स्वराज्याचा आणि हिंदू राष्ट्राच्या संकल्पनेचा मी आदर करतो, त्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्थान सर्वोच्च आहे. त्यांच्याबद्दल नकारात्मक बोलण्याचा विचार मी स्वप्नातही करू शकत नाही", असे शास्त्री म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराजांबाबत नेमके काय म्हणाले?

ते पुढे म्हणाले की, "आज हिंदू समाज जिवंत आहे, तर त्याचे सर्वाधिक श्रेय छत्रपती शिवाजी महाराजांना जाते." संभाजी ब्रिगेडसह विविध मराठी संघटनांनी व्यक्त केलेल्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी स्पष्ट केले की त्यांनी महाराजांचा अपमान केलेला नाही.

Advertisement

छत्रपती शिवाजी महाराजांवरील विधानाचा संदर्भ स्पष्ट करताना शास्त्री म्हणाले, "संदर्भ पूर्णपणे वेगळा होता. आम्ही एका शिष्याची गुरूप्रती असलेल्या भक्तीबद्दल चर्चा करत होतो. जसे महाभारतात अर्जुनाने कृष्णाला सांगितले की तो आपल्याच लोकांशी युद्ध करणार नाही, तेव्हा कृष्णाने त्याला गीता सांगितली. आम्ही संतांकडून ऐकले आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांची समर्थ रामदास स्वामींच्या प्रति खूप निष्ठा होती. आमचा हेतू त्यांची महानता सांगण्याचा होता पण गैरसमज पसरवण्यात आला."

(नक्की वाचा: Pune News: बागेश्वर बाबाविरोधात शिवप्रेमी भडकले, पुण्यात संतप्त आंदोलन, शिवरायांबाबत केलं होतं खळबळजनक विधान)

संदर्भ चुकीच्या पद्धतीने पसरवला

धीरेंद्र शास्त्री म्हणाले की, वाद आणि मीडियाचे लक्ष हे त्यांच्या नशिबाचा भाग बनले आहे. नागपुरात आल्यावर नेहमीच काहीतरी घडते. मागच्या वेळेसही मी काहीही बोललो नव्हतो तरीही वाद झाला. यावेळेस आम्ही शिवाजी महाराज किती संत-तुल्य आणि समर्पित होते, याबाबत सन्मानपूर्वक सकारात्मक गोष्ट सांगितली होती, पण ते चुकीच्या पद्धतीने सादर केले गेले."

शास्त्री यांनी पुढे सांगितले की, काही लोक सातत्याने सनातन आणि संतांचा विरोध करत आहेत. हे कदाचित एक षडयंत्र असू शकते. ज्याने पूर्ण भाषण ऐकले आहे, त्यांना यात काहीही चुकीचे वाटणार नाही. तरीही आम्ही खेद व्यक्त करून माफी मागितली आहे."

श्रद्धा आणि अंधश्रद्धेवर काय म्हणाले?

श्रद्धा आणि अंधश्रद्धेतील फरकावर बोलताना शास्त्री म्हणाले,"श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामध्ये अतिशय सूक्ष्म फरक आहे. समजुतीवर आधारित श्रद्धा म्हणजे विश्वास, तर समजुतीशिवायचा विश्वास म्हणजे अंधश्रद्धा. लोकांनी आमची पूजा करावी अशी आम्ही कधीही अपेक्षा करत नाही. प्रत्येक सभेत आणि चर्चेत आम्ही हे स्पष्टपणे सांगतो की, आम्ही लोकांना स्वतःशी जोडण्यासाठी नाही तर त्यांना भगवान बालाजी हनुमानांशी जोडण्यासाठी येथे आहोत." 

Advertisement

याच गोष्टीवर जोर देत त्यांनी म्हटलं की,"जर भगवान हनुमानाप्रती भक्ती वाढवणे, लोकांना हनुमान चालीसा वाचण्यास प्रोत्साहित करणे किंवा हनुमान मंदिरांना भेट देणे ही अंधश्रद्धा असेल, तर या देशातील सर्वच धर्मांना अंधश्रद्धा मानावे लागेल."
 
त्यांनी स्पष्ट केले की, त्यांचे व्यासपीठ अंधश्रद्धेला नव्हे, तर धर्मांतराला रोखण्यासाठी आहे. लोकसंख्या नियंत्रणाबद्दल बोलताना ते म्हणाले की, "लोकसंख्या नियंत्रण नियमावली सर्वांसाठी समान असावी. मी हिंदूंमध्ये चार मुले असावी अशी गोष्ट केली, तर त्यावरही वाद निर्माण केला गेला."

VIDEO: ''शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या असतील तर...'', Dhirendra Shastri यांच्याकडून दिलगिरी व्यक्त