Onion Market: कांदा उत्पादकांवर नवे संकट! बांगलादेशकडून आयात शुल्कात वाढ; निर्यात घसरणार

सरकारने कांदा आयातीवर 10 टक्के शुल्क लागू केले आहे. बांगलादेश सरकारकडून यासंबंधी परिपत्रक जारी करण्यात आले असून आजपासून या नियम लागू होणार आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

प्रांजल कुलकर्णी:  एकीकडे  केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर लावलेले 20 टक्के शुल्क करण्याची मागणी राज्यभरातील शेतकरी करत आहेत. अशातच कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी वाढवणारी मोठी बातमी समोर आली आहे. बांग्लादेशने कांदा आयातीवर 10 टक्के शुल्क लागू लागू केले असून यासंबंधीचे पत्रक बांगलादेश सरकारकडून जारी करण्यात आले आहे. 

केंद्र सरकारच्या निर्यात शुल्कमुळे आधीच अडचणीत सापडले असताना कांदा उत्पादक शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे राहिले आहे. बांग्लादेश सरकारने कांदा आयातीवर 10 टक्के शुल्क लागू केले आहे. बांगलादेश सरकारकडून यासंबंधी परिपत्रक जारी करण्यात आले असून आजपासून या नियम लागू होणार आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

महाराष्ट्रातून कांद्याची सर्वाधिक निर्यातही बांगलादेशमध्ये होते. गेल्या वर्षी राज्यातील 20 टक्के कांदा राज्यातून बांगलादेशमध्ये आयात करण्यात आला होता. मात्र बांगलादेशच्या या आडमुठेपणामुळे राज्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. ज्याचा परिणाम कांद्याच्या भावावर होण्याची शक्यता असून निर्यातीत घट होण्याची भिती महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने वर्तवली आहे. 

दोन दिवसांपूर्वी बांगलादेशकडून भारतातून आयात होणाऱ्या संत्रा आयात शुल्कात मोठी वाढ करण्यात आली आहे. याचा फटका संत्रा बागायतदारांना बसण्याची भीती वर्तविली जात आहे. त्यामुळे नागपूरमधील संत्रा उत्पादक शेतकरीही अडचणीत सापडले आहेत.  दरम्यान, कांद्याच्या प्रश्नावर संसदेत राज्यातील खासदारांनी प्रश्न उपस्थित केला होता. यापुढेही कांद्याच्या भावात सुधारणा झाली नाही तर  महाविकास आघाडीच्या खासदारांना बरोबर घेवून  आंदोलन उभे करण्याचे संकेत दिंडोरी लोकसभा मतदार संघाचे खासदार भास्कर भगरे यांनी  नाशिकच्या येवल्यात दिले आहेत.

Advertisement

नक्की वाचा - Crime news: रेल्वेत नोकरीचं आमिष दाखवले, 17 जणांकडून 1 कोटी उकळले, शिंदेंच्या शहराध्यक्षाने हे काय केले?

सरकारने लोकप्रिय योजनांवर मोठ्या पैसे खर्च त्यामुळे शेतकऱ्यांचे कांद्याचे अनुदान, घरकुल योजना, शेतीचे अनुदान यापासून शेतकरी वंचित  राहत आहे. शासनाने ते अनुदान तातडीने द्यावे. मते मिळविण्यासाठी निवडणुकीपूर्वी महिलांना सरसकट लाडक्या  बहिण योजनेचा लाभ देवून निवडणूक जिंकली. मात्र आता चाळणी लावली जात आहे निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाप्रमाणे सर्व महिलांना लाडक्या बहीण योजनेचा लाभ द्यावा असेही भगरे म्हणालेत.

Topics mentioned in this article