Nagpur Violence : नागपूर दंगलीचं बांगलादेश कनेक्शन? 'त्या' फेसबुक अकाऊंटवरुन खुलासा

नागपूर दंगलींच्या तपासादरम्यान एक अत्यंत महत्त्वपूर्ण बातमी समोर आली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Nagpur Violence : नागपूर दंगलींच्या तपासादरम्यान एक अत्यंत महत्त्वपूर्ण बातमी समोर आली आहे. नागपुरात झालेल्या हिसाचारात बांगलादेशी दहशतवादी संघटनांचा सहभाग असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. नागरिकांमध्ये द्वेष निर्माण करण्याच्या उद्देशाने सोशल मीडियावर पसरवल्या जाणाऱ्या चिथावणीखोर पोस्टच्या तपासणीदरम्यान पोलिसांना नागपूर दंगलीचं बांगलादेशाशी कनेक्शन असल्याचं आढळून आलं आहे. ही माहिती समोर आल्यानंतर पोलीस आणि गुप्तचर संस्था सक्रिय झाल्या आहेत. या प्रकरणात शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून या दिशेने तपासही सुरू केला आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

सोमवारी सायंकाळी नागपुरातील काही भागांमध्ये दंगलीचं वातावरण निर्माण झालं. काही समाजातील लोक रस्त्यांवर शस्त्र घेऊन धावत होते. यातील काहींनी पोलिसांवर हल्ला केला. यात 34 पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. ही दंगल सुनियोजित असल्याचे मुख्यमंत्र्यांसह पोलिसांकडून सांगितलं जात आहे. यामध्ये सोशल मीडियाची भूमिका मोठी होती, असं तपासादरम्यान दिसत असल्याचं पोलिसांनी सांगितलं. सोशल मीडियावरुन भडकाऊ संदेश पसरविण्यात आले आणि त्यातून दंगल पसरली असं म्हटलं जातं.

Advertisement

Advertisement

नक्की वाचा - Nagpur Violence: 'औरंगजेब हा संयुक्तिक मुद्दा नाही..', नागपूर हिंसाचारानंतर संघाचे मोठे वक्तव्य; हिंदू परिषदेचे कान टोचले

शहर पोलिसांची सायबर टीम सोशल मीडियावर लक्ष ठेवून आहे आणि विविध सोशल मीडिया खात्यांची सखोल तपासणी करण्यात आली. बुधवारी प्रक्षोभक पोस्ट करणाऱ्यांविरोधात चार गुन्हे दाखल झाले. एका फेसबुक अकाऊंटवरून एका विशिष्ट समुदायाविरुद्ध अत्यंत अपमानास्पद भाषेत टिप्पणी करण्यात आली. या फेसबुक अकाउंटची तपासणी केल्यावर ते बांगलादेशातून नियंत्रित होत असल्याची बाब समोर आली. त्यामुळे पोलीस देखील हादरले आहेत. यानंतर गुप्तचर संस्थाही सतर्क झाल्या आहेत व सखोल चौकशी सुरू झाली आहे. या घडामोडीला सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बळीराम सुतार यांनी दुजोरा दिला. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशीरा सुरू आहे, असे त्यांनी सांगितले.

Advertisement

नागपुरात अनेक बेकायदेशीर बांगलादेशी...
नागपुरात मोठ्या संख्येने बांगलादेशी नागरिक बेकायदेशीरपणे राहतात. मध्य आणि उत्तर नागपूरच्या दाट लोकवस्ती असलेल्या भागात मोठ्या संख्येने त्यांचा निवास आहे. अशा परिस्थितीत नागपूरमध्ये पसरलेल्या हिंसाचारात बांगलादेशचा संबंध असण्याची शक्यता असल्याने पोलीस सतर्क झाले आहेत.