जाहिरात
14 days ago

Maharashtra Baramati Assembly & Rahuri Assembly Bypoll Election Vote Counting LIVE Updates:  महाराष्ट्रातील राहुरी आणि बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीचे निकाल आज जाहीर होत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर होणाऱ्या बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह 23 उमेदवार रिंगणात आहेत.  सकाळी आठ  वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. बारामती एमआयडीसी परिसरातील वखार महामंडळाच्या गोदामात ही मोजणी पार पाडणार आहे. सुरुवातीला पोस्टल मतदान मोजलं जाईल आणि त्यानंतर साडेआठ वाजल्यापासून ईव्हीएम मशीनवरील मतदान मोजलं जाईल.

दुसरीकडे भाजप नेते शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या राहुरी पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले हे महायुतीचे उमेदवार आहेत. त्यांच्याविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार गोविंद मोकाटे वंचितचे संतोष चोळके आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे बंडखोर उमेदवार रावसाहेब खेवरे यांच्यात लढत होणार आहे. मतमोजणीची निवडणूक अधिकाऱ्यांनी तयारी केली असून, 27 फेऱ्यांमध्ये मतमोजणी होणार आहे. निकालाचा पहिला कल हा सकाळी नऊ वाजता येऊन, दुपारपर्यंत निकालाचे चित्र स्पष्ट होईल.

बारामतीत NCP कार्यकर्त्यांनी लावलेल्या बॅनरची का होतेय चर्चा?

"निवडणूक आज असो, पाच वर्षांनी असो, वा 10 वर्षांनी..आम्ही बारामतीकर फक्त त्यांच्याच मागे उभे राहणार ज्यांच्या नावात अजितदादा पवार हे नाव असेल,आदरणीय वहिनी साहेब अभिनंदन",अशा आशयाचा बॅनर लावून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अजित पवार कुटुंबासोबत आणि राष्ट्रवादीसोबत एकनिष्ठ असल्याचा दाखला दिला. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा मोठा विजय झाला आहे. सुनेत्रा पवारांना विक्रमी मातधिक्य मिळाल्यानं अनेक ठिकाणी बॅनर्स लावून त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. 

Baramati Assembly Bypoll Election Result LIVE Updates: बारामतीत सुनेत्रा पवार यांचा मोठा विजय! रोहित पवारांचे ट्वीट

बारामतीत सुनेत्रा पवार यांचा मोठा विजय! रोहित पवारांचे ट्वीट...

Baramati Election Result: सुनेत्रा पवार विक्रमी मतांनी विजयी! जय पवार यांनी घेतले अजित दादांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन

बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीचा सुनेत्रा पवार यांनी दोन लाख 18 हजार 930 इतकी मतं मिळवत देशात एक मोठा विक्रम केला आहे यानंतर दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे पुत्र जय पवार यांनी बारामती मधील विद्या प्रतिष्ठान येथील अजित पवार यांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेतलं आहे.

baramati Assembly Bypoll Election Result LIVE Updates: बारामतीत झळकले विजयाचे बॅनर

राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत ऐतिहासिक मताधिक्य आणि विजय झाल्यानंतर बारामती मध्ये विशाल पोपटराव जाधव मित्रपरिवारकडून बॅनर बाजी करण्यात आली आहे.

निवडणूक आज असो पाच वर्षांनी असो वा 10 वर्षांनी आम्ही बारामतीकर फक्त त्यांच्याच मागे उभे राहणार ज्यांच्या नावात अजित दादा पवार हे नाव असेल असं म्हणत आदरणीय वहिनी साहेब अभिनंदन असं या मजकूर वरती लिहिण्यात आलं आहे.

Baramati Assembly Bypoll Election Result LIVE Updates: सुनेत्रा पवारांचा नवा विक्रम, इतिहासातील मोठा विजय

सुनेत्रा पवार यांच्या नावाने बारामती मध्ये नवा विक्रम

२०१९ मधील अजित पवारांचा मताधिक्याचा विक्रम मोडला

सुनेत्रा पवार यांना १९ व्या फेरी मध्ये १ लाख ६८ हजार मतांची आघाडी

२०१९ मध्ये अजित दादांना एकूण  १ लाख ६५ हजारांचे होते मताधिक्य

बारामती पोटनिवडणुकीच्या एकूण २४ फेरींपैकी १९ फेऱ्यांचे निकाल समोर

Baramati Assembly Bypoll Election Result LIVE Updates: बारामती निवडणूक, नवव्या फेरीची मतमोजणी

नवव्या फेरी अखेर मते

सुनेत्रा पवार : 78528

अभिजीत बिचुकले : 94

करुणा मुंडे : 97

चंद्रकांत वाघमोडे : 61

नोटा :  251

एकूण मोजून झाले : 79939

Rahuri Assembly Bypoll Election Result LIVE Updates: अक्षय कर्डिलेंच्या विजयाची औपचारिकता बाकी

राहुरी आठरावी फेरी अखेर..

एकुण मतमोजणी- 125442

भाजपा-अक्षय कर्डिले- 90638

राष्ट्रवादी गोंविद मोकाटे- 17802

कर्डिले 72836 मतांनी आघाडीवर

Baramati Assembly Bypoll Election Result LIVE Updates: सुनेत्रा पवारांच्या विजयाचा जल्लोष; कार्यकर्त्यांकडून गुलाल उधळला

बारामती येथे पार पडलेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा विजय निश्चित मानला जात असताना राज्यभरात जल्लोषाला सुरुवात झाली आहे. अकोल्यातही राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शहरातील नवीन बस स्थानक चौकात सुनेत्रा पवार यांच्या विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आला.

 यावेळी पदाधिकाऱ्यांनी ढोल-ताशांच्या गजरात फटाके फोडून आनंद व्यक्त केला. तसेच कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे वाटून विजयाचा आनंद साजरा केला.या जल्लोषामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी पदाधिकाऱ्यांनी बारामतीकरांचे आभारही मानले. 

Baramati Assembly Bypoll Election Result LIVE Updates: राहुरीत अक्षय कर्डिलेंची विजयी घौडदौड कायम

राहुरी सोळावी फेरी अखेर..

एकुण मतमोजणी- 111491

भाजपा-अक्षय कर्डिले- 80411

राष्ट्रवादी गोंविद मोकाटे- 14555

Baramati Assembly Bypoll Election Result LIVE Updates बारामतीत सुनेत्रा पवारांनी अजित पवारांचा विक्रम मोडला

पंधरावी फेरी नंतर सुनेत्रा पवार यांना १ लाख ३२ हजार ९१६ चे मताधिक्य

पंधराव्या फेरीत सुनेत्रा पवार यांना एकूण ११ हजार ६१ मतं

Rahuri Assembly Bypoll Election Result LIVE Updates: राहुरीत कर्डिले 62647 मतांनी आघाडीवर

राहुरी पंधरावी फेरी अखेर..

एकुण मतमोजणी- 105616

भाजपा-अक्षय कर्डिले- 76162

राष्ट्रवादी गोंविद मोकाटे- 13515

कर्डिले 62647 मतांनी आघाडीवर

Baramati Assembly Bypoll Election Result LIVE Updates: पंधराव्या फेरी अखेर सुनेत्रा पवार यांना १ लाख १२ हजार २६८

पंधराव्या फेरी अखेर सुनेत्रा पवार यांना १ लाख १२ हजार २६८

तेराव्या फेरीत सुनेत्रा पवार यांना ८५६९ मतं

सुनेत्रा पवार यांनी मोडला अजित दादांचा २०२४ मधील विक्रम

२०२४ मध्ये अजित पवारांचा १ लाख १ हजारांनी झाला होता विजय

Rahuri Assembly Election: अक्षय कर्डिले यांचा विजय निश्चित: कार्यकर्त्यांना विश्वास

राहुरी नगर विधानसभा पट निवडणुकीमध्ये भाजपचे उमेदवार हे अकरावा फेरी अखेर 46,405 मतांनी आघाडीवर आहेत.. उमेदवार आघाडीवर असल्याकारणाने भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मतमोजणी केंद्राबाहेर जल्लोष केल्याचे पाहायला मिळालं.‌. यावेळी आज स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले नसल्याची खंत कार्यकर्त्यांनी बोलून दाखवली... तर ही निवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती परंतु शरद पवार यांनी उमेदवार दिला आणि या उमेदवाराला मतदारांनी देखील त्यांची जागा दाखवली अशा प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या

Baramati Assembly Bypoll Election Result LIVE Updates: बारामतीत सातव्या फेरीची मतमोजणी

बारामती सातव्या फेरी अखेर मते

सुनेत्रा पवार : 61917

अभिजीत बिचुकले : 76

करुणा मुंडे : 77

चंद्रकांत वाघमोडे : 45

नोटा : 178

एकूण मोजून झाले : 63086

Baramati Assembly Bypoll Election Result LIVE Updates: बारावी फेरी अन् प्रचंड मोठा आकडा, बारामतीत सुनेत्रा पवार यांची विक्रमाकडे वाटचाल

बाराव्या फेरी अखेर सुनेत्रा पवार यांना 1,03,709 मतांची आघाडी..  एक लाख मतांचा टप्पा ओलांडला

Rahuri Assembly Bypoll Election Result LIVE Updates: बारावी फेरी पूर्ण, कर्डिले 50273 मतांनी आघाडीवर

भाजपा-अक्षय कर्डिले- 61035

राष्ट्रवादी गोंविद मोकाटे- 10762

कर्डिले 50273 मतांनी आघाडीवर

Baramati Assembly Bypoll Election Result LIVE Updates: बारामती पोटनिवडणूक निकाल, पाचव्या फेरीची मतमोजणी

पाचवी फेरी अखेर मते

सुनेत्रा पवार : 44796


अभिजीत बिचुकले : 50


करुणा मुंडे : 57


चंद्रकांत वाघमोडे : 22


नोटा : 139

एकूण मोजून झाले : 

(पाचवी फेरी अखेर 45676   मतदान मोजले यापैकी विरोधकांना  741 मते मिळाली तर 139 मते नोटाला गेली.  अशी एकूण 880 मते विरोधात गेली )

Baramati Assembly Bypoll Election Result LIVE Updates: सुनेत्रा पवार यांना 78528 मतांची आघाडी

बारामती विधानसभा पोटनिवडणूक आत्तापर्यंत नऊ फेऱ्यांमधून झाले असून दहाव्या फेरीची मोजणी सुरू झाली आहे. नवव्या फेरी अखेर सुनेत्रा पवार यांना 78528 मताची आघाडी.

Baramati Assembly Bypoll Election Result LIVE Updates: विक्रमी विजयाआधी सुनेत्रा पवार यांचा मोठा निर्णय, बारामती करांना आवाहन

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर होत असताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी ट्विट करत मतदारांचे आभार मानले आहेत.

सुनेत्रा पवार यांनी आपल्या संदेशात म्हटले की, बारामतीकरांनी दाखवलेला विश्वास हा दिवंगत अजित पवार यांच्या पवित्र स्मृतींना समर्पित आहे. निकालाच्या पार्श्वभूमीवर दादांच्या आठवणींना उजाळा मिळाल्याने सर्वजण भावूक झाल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच कार्यकर्त्यांना आवाहन करताना त्यांनी विजयाचा जल्लोष टाळण्याचे सांगितले. कुणीही मिरवणुका काढू नयेत किंवा गुलाल उधळू नये, संयम राखून दादांच्या विचारांना साजेसे वर्तन करावे, अशी विनंती त्यांनी केली.

बारामतीकरांनी दिलेल्या संधीबद्दल आभार व्यक्त करत, दादांच्या स्वप्नातील बारामती घडवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. हा शेवट नसून नव्या बारामतीच्या उभारणीची ही सुरुवात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Baramati Assembly Bypoll Election Result LIVE Updates: सुनेत्रा पवार यांना तब्बल ७०,००० मतांची आघाडी

बारामतीमध्ये आठव्या फेरीची मतमोजणी पूर्ण झाली आहे. आठव्या फेरीनंतर सुनेत्रा पवार यांनी तब्बल ७०,००० मतांची आघाडी घेतली आहे. सुनेत्रा पवार यांच्या मतांच्या जवळपासही विरोधी उमेदवार नाहीत. 

Baramati Assembly Bypoll Election Result LIVE Updates: बारामतीत सात फेऱ्यांची मतमोजणी पूर्ण, सुनेत्रा पवारांना विक्रमी लीड

बारामती पोटनिवडणुकीसाठी आतापर्यंत सात फेऱ्या मोजून झाल्या आहेत आता आठवी फेरी मोजणी सुरुवात होईल. सातव्या फेरी अखेर सुनेत्रा पवार यांनी 61, 917 मतांची आघाडी घेतली आहे. 

Rahuri Assembly Bypoll Election Result LIVE Updates: राहुरीत सहावी फेरी पूर्ण, अक्षय कर्डिलेंना किती मते?

राहुरी सहावी फेरी अखेर..

भाजपा-अक्षय कर्डिले- 29903

राष्ट्रवादी गोंविद मोकाटे- 4417

कर्डिले 25486 मतांनी आघाडीवर

Baramati LIVE Updates: बारामतीत सुनेत्रा पवारांची विजयाकडे वाटचाल

बारामती तिसरी फेरी अखेर मते

सुनेत्रा पवार : 26773

अभिजीत बिचुकले : 19

करुणा मुंडे : 33

चंद्रकांत वाघमोडे : 9

नोटा : 88

एकूण मोजून झाले : 27250

(दुसऱ्या फेरी अखेर 27250  मतदान मोजले यापैकी विरोधकांना 389 मते गेली तर नोटाला 88 मते गेली अशी 477  मते विरोधात गेली)

Rahuri Assembly Bypoll Election Result LIVE Updates: अक्षय कर्डिलेंची विजयाकडे वाटचाल

राहुरी विधानसभा पोटनिवडणूक

पाचव्या  फेरी अखेर मिळालेली मते

भाजप अक्षय कर्डिले - 25408

राष्ट्रवादी SP गोविंद मोकाटे- 3522

वंचित संतोष चोळके- 1438

अपक्ष रावसाहेब खेवरे- 1603

 0पाचव्या फेरी अखेर भाजपचे अक्षय कर्डीले 21886  मतांनी आघाडीवर

Baramati Assembly Bypoll Election Result LIVE Updates: सुनेत्रा पवारांना 45010 मतांची आघाडी

बारामती विधानसभा पोटनिवडणूक: 


पाचव्या फेरी अखेर सुनेत्रा पवार 45010 मतांनी आघाडीवर

दुसरी फेरी अखेर मते

सुनेत्रा पवार : 16543

अभिजीत बिचुकले : 15

करुणा मुंडे : 18

चंद्रकांत वाघमोडे : 5

नोटा : 48

एकूण मोजून झाले : 16843

Baramati Assembly Bypoll Election Result LIVE Updates: राहुरीत अक्षय कर्डिलेंची विजयाकडे वाटचाल, 21886 मतांची आघाडी

राहुरी पाचवी फेरी अखेर..

भाजपा-अक्षय कर्डिले- 25408

राष्ट्रवादी गोंविद मोकाटे- 3522

कर्डिले 21886 मतांनी आघाडीवर

Baramati Assembly Bypoll Election Result LIVE Updates: बारामतीत पाच फेऱ्या पूर्ण! सुनेत्रा पवारांची विजयाकडे वाटचाल

बारामती पोटनिवडणुकीसाठी आतापर्यंत पाच फेऱ्या मोजून झाल्या आहेत. सहावी फेरी आता मोजणीस घेतील. आत्तापर्यंतच्या निकालामध्ये सुनेत्रा पवार यांनी सर्वात मोठी आघाडी घेतली आहे. 

Baramati Assembly Bypoll Election Result LIVE Updates: बारामतीत सुनेत्रा पवारांची जोरदार मुसंडी, तब्बल ३६,००० मतांची आघाडी

बारामती ब्रेकिंग 

बारामती विधानसभा पोटनिवडणूक...

चौथ्या फेरी अखेर सुनेत्रा पवार 36591 मतांनी आघाडीवर..

Rahuri Assembly Bypoll Election Result LIVE Updates: राहुलीत अक्षय कर्डिलेंची जोरदार मुसंडी

राहुरी विधानसभा पोटनिवडणूक मतमोजणी, तिसरी फेरी

  1. भाजपा-अक्षय कर्डिले- 16852
  2. राष्ट्रवादी गोंविद मोकाटे- 2141

राहुरी विधानसभा पोटनिवडणूक मतमोजणी, चौथी फेरी

  1. भाजपा-अक्षय कर्डिले- 20849
  2. राष्ट्रवादी गोंविद मोकाटे- 2726

कर्डिले 18123 मतांनी आघाडीवर

Baramati Assembly Bypoll Election Result LIVE Updates:बारामतीकरांचं दादांवर प्रेम, नोटाला 28 मते

बारामती पोटनिवडणुकीत पहिल्या फेरी अखेर 9020 मतं मोजून झाले आहेत. यामध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना 8868 मते मिळाली आहेत तर विशेष म्हणजे अपक्ष उमेदवारांपेक्षा नोटाला सर्वाधिक म्हणजे 28 मते मिळाले आहेत. 

Baramati Assembly Bypoll Election Result LIVE Updates: पहिल्या फेरीत कुणाला किती?

पहिली फेरी 

सुनेत्रा पवार : 8868

अभिजीत बिचुकले : 7

करुणा मुंडे : 10

चंद्रकांत वाघमोडे : 5

नोटा : 28

एकूण मोजून झाले : 9020

Rahuri Assembly Bypoll Election Result LIVE Updates: अक्षय कर्डिलेंची मोठी आघाडी, शरद पवारांचा उमेदवार पिछाडीवर

राहुरी दुस-या फेरी अखेर अक्षय कर्डिलेंची मोठी आघाडी, शरद पवारांचा उमेदवार पिछाडीवर 

भाजपा-अक्षय कर्डिले- 11071

राष्ट्रवादी गोंविद मोकाटे- 1434

Baramati Assembly Bypoll Election Result LIVE Updates: बारामतीत सुनेत्रा पवार तब्बल 16000 मतांनी आघाडीवर

बारामती विधानसभा पोटनिवडणूक निकाल: सुनेत्रा पवारांची आघाडी, दुसऱ्या फेरी अखेर सुनेत्रा पवार 16543 मतांनी आघाडीवर

Baramati Assembly Bypoll Election Result LIVE Updates: जय पवार मतमोजणी केंद्रावर दाखल

बारामती पोटनिवडणुकीसाठी तिसऱ्या फेरीसाठी मतपेटी मोजणी करता घेतल्या.. जय पवार काही वेळाने महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ मतमोजणी केंद्रावर येत आहेत.

Rahuri Assembly Bypoll Election Result LIVE Updates: राहुरीत अक्षय कर्डिलेंची 4266 मतांची आघाडी

राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत अक्षय कर्डिले ४ हजार २६६ मतांनी आघाडीवर... भाजपची जोरदार मुसंडी 

Rahuri Assembly Bypoll Election Result LIVE Updates: राहुलीत अक्षय कर्डिलेंचा दबदबा, 460 मतांची आघाडी

राहुरी विधानसभेच्या पोटनिवडणुकीत अक्षय कर्डिले यांनी मोठी आघाडी घेतली आहे. भाजपचे अक्षय कर्डिले EVM आणि टपाल मतमोजणीत 460 मतांनी आघाडीवर आहेत. 

Baramati Assembly Bypoll Election Result LIVE Updates:बारामतीत पहिली फेरी पूर्ण! सुनेत्रा पवारांची मोठी आघाडी

बारामती विधानसभा पोटनिवडणूक: 

पहिल्या फेरी अखेर सुनेत्रा पवार 6500 मतांनी आघाडीवर 

Rahuri Assembly Bypoll Election Result LIVE Updates: राहुरीत मतमोजणीला सुरुवात, अक्षय कर्डिलेंची आघाडी

राहुरी विधानसभेच्या पोटनिवडणूक मतमोजणीला सुरुवात.. पोस्टल मतमोजणीत अक्षय कर्डिले आघाडीवर 

Baramati Assembly Bypoll Election Result LIVE Updates: बारामतीत मतमोजणीला सुरुवात, सुनेत्रा पवारांची आघाडी

  1. बारामती पोटनिवडणूक मतमोजणीला सुरुवात 
  2. पोस्टल मतांमध्ये सुनेत्रा पवार यांची आघाडी 
  3. 235 मतांनी सुनेत्रा पवार आघाडी वरती.

Baramati Assembly Bypoll Election Result LIVE Updates: बारामती पोटनिवडणुकीच्या मोजणीसाठी स्ट्रॉंग रूम उघडली

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी आज पार पडत आहे. बारामती मधील वखार महामंडळाच्या गोदामामध्ये हि मतमोजणी पार पडणार आहे. या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या ईव्हीएम मत पेट्यांची स्ट्रॉंग रूम आठ वाजून चार मिनिटांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत उघडण्यात आली. आता काही वेळातच मतमोजणीला सुरुवात होणार आहे.

Baramati Assembly Bypoll Election Result LIVE Updates: मतमोजणीची तयारी पूर्ण! बारामतीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष

  •  बारामती विधानसभा पोटनिवडणूक मतमोजणी आज (4 मे)

  •  23 एप्रिलला मतदान; आता सर्वांचे लक्ष निकालाकडे

  •  दिवंगत अजित पवार यांच्या निधनानंतर जागा रिक्त

  •  28 जानेवारी 2026 रोजी विमान अपघातात निधन

  •  सुनेत्रा अजित पवार यांचा विजय जवळपास निश्चित मानला जातो

  •  महायुतीकडून (राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना) पूर्ण पाठिंबा

  •  सुरुवातीला बिनविरोध चर्चा, पण अखेर 53 अर्ज

  • माघारीनंतर 23 उमेदवार रिंगणात

  •  बहुतेक उमेदवार अपक्ष

  •  मतदान टक्केवारी: 58.27%

  •  2024 मध्ये 72% मतदान झाले होते

  •  मतमोजणी ठिकाण: एमआयडीसी बारामती गोदाम

  •  सकाळी 8 वाजता मतमोजणी सुरू

  •  सुमारे 300 अधिकारी-कर्मचारी नियुक्त

  •  20 EVM टेबल, 6 पोस्टल मतपत्रिका टेबल

  •  कडक पोलीस बंदोबस्त, फक्त अधिकृत व्यक्तींनाच प्रवेश

  •  प्रथमच QR कोड प्रणाली लागू

  • * माध्यमांसाठी स्वतंत्र कक्ष, फेरीनिहाय निकाल उपलब्ध

  • * मतमोजणी केंद्रात मोबाईल वापरावर बंदी

Baramati Assembly Bypoll Election Result LIVE Updates: बारामतीचा निकाल एकतर्फी लागणार! सुनेत्रा पवारांचा विजय निश्चित

अजित पवारांच्या निधनानंतर बारामती विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक पार पडतेय. या निवडणुकीत अजित पवारांच्या पत्नी आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार रिंगणात उभ्या आहेत. बारामतीमधून सुनेत्रा पवारांसह 23 उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आहेत.

  बारामती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला.. त्यामुळे या मतदारसंघात शरद पवार गटाकडून उमेदवार देण्यात आला नव्हता. त्यामुळे बारामतीची निवडणूक एकतर्फी असल्याचं दिसत आहे. सुनेत्रा पवारांचं पारडं जड असून त्यांचा विजय निश्चित मानला जातोय. मात्र त्या किती मताधिक्यानं निवडून येणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Baramati Assembly Bypoll Election Result LIVE Updates: अजित पवारांचा विक्रम सुनेत्रा पवार मोडणार?

अजित पवार यांच्या निधनानंतर झालेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर होत आहे. 23 एप्रिल रोजी अजित पवारांना मतपेटीतून श्रद्धांजली वाहण्यासाठी बारामतीकर घराबाहेर पडले होते. त्यामुळे आजच्या निकालात सुनेत्रा पवार यांचा विजय जवळपास निश्चित आहे. या निकालात त्या सर्व रेकॉर्ड्स मोडण्याची शक्यता आहे. याआधी अजित पवार यांनी एक लाख 65 हजार 265 मतांनी गोपीचंद पडळकर यांचा पराभव केला होता. आता हा रेकॉर्ड सुनेत्रा पवार मोडणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

Rahuri Assembly Bypoll Election Result LIVE Updates: राहुरीत अक्षय कर्डिलेंची प्रतिष्ठा पणाला

राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची मतमोजणी आज  होणार आहे. 20 टेबलांवर ही मतमोजणी होणार असून 27 फेऱ्या होणार आहेत. राहुरी शहरातील धुमाळ महाविद्यालयात ही मतमोजणीची प्रकिया पार पडेल. 

पोटनिवडणुकीसाठी 56 टक्के मतदान झाले असून 1 लाख 87 हजार 463 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. भाजपाचे अक्षय कर्डिले यांचे पारडे जड वाटत असले तरी आमदारकीचा गुलाल कुणाच्या अंगावर पडणार हे उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत स्पष्ट होईल. प्रशासनाकडून मतमोजणीची जय्यत तयारी करण्यात आली आहे. 

Baramati Assembly Bypoll Election Result LIVE Updates: बारामती पोटनिवडणूक निकाल! थोड्याच वेळात मतमोजणी

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतमोजणी पार पडत आहे.सकाळी 8:00 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे.सुरुवातीला पोस्टल मतदान मोजलं जाईल आणि त्यानंतर ईव्हीएम मशीन वरील मतदान मोजण्यास सुरुवात होईल. पोस्टल मत पेट्या सध्या बारामती मधील वखार महामंडळाच्या गोदामाच्या ठिकाणच्या मतमोजणी केंद्रावर पोहोच झाल्या आहेत.थोड्याच वेळात आता मतमोजणीला सुरुवात होणार आहे.

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी 23 एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडली होती यामध्ये दोन लाख 23 हजार 705 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या महायुतीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारासून सुनेत्रा पवारांसह या निवडणुकीत तब्बल 23 उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात आहेत.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com