देवा राखुंडे, बारामती:
Baramati By Election: अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीचे बिगुल अखेर वाजले आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने ताकद लावलेली असतानाच काँग्रेसने आपला उमेदवार जाहीर केला आहे, त्यामुळे बारामतीमध्ये तिहेरी लढत पाहायला मिळणार आहे. काँग्रेसने आकाश मोरे यांना आपली उमेदवारी दिली असून आज ते आपला अर्ज दाखल करणार आहेत. त्याचबरोबर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारही आज आपला उमेदवारी अर्ज भरतील.
IAS Tukaram Mundhe : ना दहावं ना तेरावं; आईच्या निधनानंतर IAS तुकाराम मुंढेंचा आणखी एक धाडसी निर्णय
बारामतीत तिरंगी लढत, काँग्रेसचा उमेदवार ठरला!
काँग्रेसने बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवार जाहीर केला आहे. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून एडवोकेट आकाश विश्वनाथ मोरे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. यापूर्वी देखील 2014 च्या विधानसभा निवडणुकीवेळी काँग्रेसकडून आकाश मोरे यांना उमेदवारी देण्यात आली होती, मात्र 2014 च्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता.
त्यानंतर आता पुन्हा एकदा राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागी बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून एडवोकेट आकाश मोरे यांची उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. बारामती विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून शर्तीचे प्रयत्न करण्यात आले, मात्र याला अपयश आले आहे.
महाविकास आघाडीच्या जागा वाटपात बारामती विधानसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वाट्याला आहे, मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने बारामती विधानसभेची पोटनिवडणूक लढण्यास स्पष्ट नकार दिला. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांना देखील सुनेत्रा पवार यांना आपला पाठिंबा दर्शवलेला आहे. असं असताना ही निवडणूक लढवण्यावर काँग्रेस मात्र ठाम होती. स्वतः शरद पवार ही पोट निवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न करत होते मात्र सध्या तरी या प्रयत्नांना अपयश आला आहे.
राष्ट्रवादीकडून बिनविरोध करण्याचे प्रयत्न...!
बारामतीत सुनेत्रा पवारांच्या विरोधात आता काँग्रेसचा उमेदवार मैदानात असणार आहे. तसेच ओबीसी नेते लक्ष्मण हाके देखील उद्या स्वतःची उमेदवारी दाखल करणार आहे बाराम, त्यामुळे बारामतीची पोटनिवडणूक तिरंगी होणार आहे. दरम्यान, बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी गरज पडली तर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भेट घेणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली आहे.
बारामती विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासह इतर पक्षांनी पाठिंबा दिला आहे काँग्रेसनेही तो पाठिंबा द्यावा अशी आमची भूमिका आहे यासाठी गरज पडली तर लोकसभेतील विरोधी पक्षनेते व काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भेट घेऊ. सध्या आमचे लक्ष बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीवरती आहे, असं तटकरे म्हणालेत.