जाहिरात

Shirdi News: “माझ्या मृत्यूला कॅप्टन खरात जबाबदार", भोंदूबाबाची शिर्डीतील 4 वर्षांपूर्वीची फाईल आली समोर

खरातचं चार वर्षापूर्वीचं शिर्डीतील एक प्रकरण उघडकीस आलं आहे. चार वर्षांपूर्वी घडलेल्या विकास रामदास दिवटे आत्महत्या प्रकरणाने पुन्हा एकदा जोर धरला असून या प्रकरणाची पुन्हा चौकशी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Shirdi News: “माझ्या मृत्यूला कॅप्टन खरात जबाबदार", भोंदूबाबाची शिर्डीतील 4 वर्षांपूर्वीची फाईल आली समोर
Ashok Kharat Shirdi Files Latest News

सुनिल दवंगे, प्रतिनिधी 

Ashok Kharat Shirdi Case : महिलांचे लैंगिक शोषण आणि फसवणूक प्रकरणात गजाआड असलेला भोंदूबाबा अशोक खरातबाबत दररोज धक्कादायक माहिती समोर येत आहे. विशेष तपास पथकाकडून खरातची कसून चौकशी केली जात आहे. अशातच खरातचं चार वर्षापूर्वीचं शिर्डीतील एक प्रकरण उघडकीस आलं आहेचार वर्षांपूर्वी घडलेल्या विकास रामदास दिवटे आत्महत्या प्रकरणाने पुन्हा एकदा जोर धरला असून या प्रकरणाची पुन्हा चौकशी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.जून 2022 मध्ये साईसंस्थानच्या दिवटे नामक कर्मचाऱ्याच्या आत्महत्येप्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.मात्र,चार्जशीटमधून अशोक खरातचे नाव वगळण्यात आल्याने या तपासावर सुरुवातीपासूनच प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.

या संदर्भात फिर्यादी व मयताचा भाऊ राजेंद्र दिवटे यांनी तीव्र आक्षेप नोंदवत न्याय मिळावा यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला आहे.आता दिवटे यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात जाऊन पुनर्चौकशीसाठी अधिकृत अर्ज दाखल करणार असल्याची माहिती समोर आली आहे.त्यामुळे चार वर्षांपूर्वी बंद पडलेली फाईल पुन्हा उघडण्याची शक्यता निर्माण झाली असून शिर्डी परिसरात या प्रकरणाची पुन्हा चर्चा रंगू लागली आहे.

नक्की वाचा >> Emotional Video: "आज माझा शेवटचा दिवस..", शाळेतील वर्गात शिक्षिकेचे शब्द ऐकताच मुलांच्या अश्रूंचा बांध फुटला

“माझ्या मृत्यूला कॅप्टन खरात जबाबदार आहे”

दरम्यान,या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे विकास दिवटे यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेली कथित सुसाईड नोट.या नोटमध्ये “माझ्या मृत्यूला कॅप्टन खरात जबाबदार आहे” असा स्पष्ट उल्लेख आढळून येतो.तसेच त्यांनी फोनवरून धमक्या दिल्याचा आरोप करत आपल्या मोबाईलमध्ये संबंधित कॉल रेकॉर्डिंग असल्याचेही नमूद केले आहे.यामुळे या प्रकरणातील पुराव्यांच्या विश्वसनीयतेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. याशिवाय,सुसाईड नोट ५ जून रोजी लिहिलेली असताना प्रत्यक्ष आत्महत्या ९ जून रोजी झाल्याचे समोर आले आहे. या चार दिवसांच्या कालावधीत नेमके काय घडले, कोणाशी संपर्क झाला, किंवा कोणत्या दबावाखाली निर्णय घेतला गेला का, याबाबत संशय अधिक गडद झाला आहे.

नक्की वाचा >> महिलेनं तब्बल 27 किलो वजन घटवलं, कोणत्या वेळी काय करावं? ट्रेनरने सांगितला Fat Loss चा नंबर 1 प्लॅन

चार्जशीटमधून प्रमुख आरोपीचे नाव वगळण्यात आल्याच्या आरोपांमुळे तपास प्रक्रियेवरही शंका उपस्थित केली जात आहे. “पुरावे असूनही कारवाई का झाली नाही? तपासावर कोणाचा दबाव होता का?” असे सवाल राजेंद्र दिवटे यांनी उपस्थित केले आहेत. दरम्यान, पुनर्चौकशीचा अर्ज दाखल झाल्यानंतर पोलिस यंत्रणा या प्रकरणात नव्याने तपास सुरू करणार का, आणि यामधून कोणते नवे धागेदोरे समोर येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिर्डीतील या प्रकरणाने पुन्हा एकदा न्यायव्यवस्था आणि तपास प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com