Baramati Crime: एवढी हिंमत होतेच कशी? स्टंटबाजी करताना अडवलं, थेट पोलिसाच्या अंगावर गाडी घातली

Baramati Crime News: 29 मे रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती मिळत असून अध्यापन पोलीस खात्याकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

जाहिरात
Read Time: 2 mins

देवा राखुंडे, बारामती: रस्त्यावर स्टंटबाजी करणाऱ्या वाहन चालकाकडून पोलीस हवालदाराला जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक प्रकार बारामतीमध्ये घडला आहे. रस्त्यावर स्टंटबाजी करतो म्हणून पोलिसांनी हटकल्याने वाहन चालकाने थेट अंगावरच गाडी घातली. या घटनेत पोलीस हवालदार संतोष दत्तू कांबळे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

याबाबत सविस्तर माहिती अशी की, रात्रीच्या वेळी रस्त्यात स्टंट करणाऱ्या वाहन चालकाला हटकले म्हणून बारामतीत एका पोलिस हवालदाराच्या अंगावर गाडी घालून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न झाला आहे.या घटनेत बारामती तालुका पोलिस ठाण्यातील पोलिस हवालदार गंभीर जखमी झाला आहे. संतोष दत्तू कांबळे असं या जखमी पोलीस हवालदाराचे नाव आहे.

या प्रकरणी अज्ञात वाहन चालकावर बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा ही दखल करण्यात आला आहे. घटनेत जखमी झालेले पोलीस हवालदार कांबळे यांना बारामतीमधील भाग्यजय हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आणि असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. बारामती शहरातील विद्या प्रतिष्ठानकडे जाणाऱ्या रस्त्यावर 29 मे रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती मिळत असून अध्यापन पोलीस खात्याकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

नक्की वाचा - Pune News : पुण्यात भरधाव कारने 12 जणांना उडवले, MPSC चे विद्यार्थी जखमी