देवा राखुंडे, बारामती:
Malegaon Sugar Factory Election Results : बारामती तालुक्यातील माळेगाव कारखान्याची मतदान प्रक्रिया सुरू असून हळूहळू याचा निकाल समोर यायला लागला आहे. या निवडणुकीत अजित पवार यांच्या श्री. निलकंठेश्वर पॅनेलने विजयाकडे वाटचाल सुरु केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या श्री निळकंठेश्वर पॅनलचे 11 उमेदवार विजयी झाले असून निकालानंतर कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत जल्लोष सुरु केला आहे.
बारामती मालेगाव सहकारी साखर कारखान्याचा संचालक पदाचा निकाल बाहेर आल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या श्री निळकंठेश्वर पॅनलने जल्लोष सुरु केला आहे. निवडणुकीत अजित पवार गटाच्या निळकंठेश्वर पॅनेलकडे बहुमत दिसू लागल्यानंतर मतमोजणी केंद्राच्या प्रशासकीय भवनासमोर गुलालाची उधळण करीत फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली आहे. अजित पवार जिंदाबाद अशा घोषणा यावेळी कार्यकर्त्यांनी दिल्या आहेत.
ब वर्गातून उपमुख्यमंत्री अजित पवार, अनुसूचित जाती जमाती मतदारसंघातून नीलकंठेश्वर पॅनलचे रतन कुमार भोसले, इतर मागासवर्गीय प्रवर्गातून नितीन शेंडे यांच्यासह आता भटक्या विमुक्त जाती जमाती प्रवर्गातून विलास ऋषिकांत देवकाते हे 2227 मतांनी विजयी झाले आहेत. आत्तापर्यंतच्या मतमोजणीत अजित पवार यांच्या पॅनेलचे चार उमेदवार विजयी झाले आहेत. सध्या सुरु असलेल्या मतमोजणीत अजित पवार यांच्याकडे 16 जागांची आघाडी असून चंद्रराव तावरे यांच्या गटाकडे तीन जागांची आघाडी आहे.
नक्की वाचा - Malegaon Sugar Factory Election Live Updates: माळेगाव निवडणूक निकाल: अजित पवार यांच्या पॅनेलचे 16 उमेदवार आघाडीवर