देवा राखुंडे, बारामती: जलसंपदा विभागाने नाल्याची साफसफाई न केल्याने नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याचा प्रकार समोर आला आहे. बारामती तालुक्यातील डोर्लेवाडी गावात हा प्रकार घडला. घरात पाणी शिरल्याने संसारोपयोगी साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
याबाबत सविस्तर माहिती अशी की, मे महिन्यात सलग चार दिवस मुसळधार पाऊस पडत असल्याने बारामती तालुक्यातील डोर्लेवाडी गावातील नागरिकांच्या घरात थेट या पावसाचे पाणी शिरला आहे. यामध्ये नागरिकांच्या घरातील संसार उपयोगी साहित्याचेही नुकसान झाले आहे.
जलसपंदा विभागाच्या अंतर्गत असलेल्या चारीची साफसफाई वेळेवर न केल्याने हे पावसाचे पाणी घरात शिरला गेले. घरात पावसाचे पाणी गेल्याने सर्व संसार उपयोगी वस्तू पाण्यात गेल आहे. धान्य भिजले असल्याने मोठ्या प्रमाणात नागरिकांचे नुकसान झाले आहे. या प्रकारामुळे नागरिकांनी संताप व्यक्त करत शासनाच्या वतीने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
नक्की वाचा - Solapur Crime : 9 वर्षांच्या चिमुरडीला शेतात पुरलं, मुलीचे वडील चौकशीच्या फेऱ्यात
मोहोळ तालुक्यातील शिरापूर येथे अंगावर गोठा कोसळल्यामुळे 80 वर्षे वयोवृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. गेल्या चार दिवसापासून पडत असलेल्या पावसामुळे शिरापूर येथील गायकवाड यांचा गायांचा गोठा ढासळला. यामध्ये तानुबाई मारुती गायकवाड यांचा मृत्यू झाला. शेतात भावाचा मुलगा दिग्विजय ताकमोगे यांनी शेतात गेल्यानंतर गोठा कोसळल्याचे पाहिले त्यानंतर पडलेल्या गोठ्याखाली तानुबाई गायकवाड दिसून आल्या. त्यांना तातडीने मोहोळ येथील ग्रामीण रुग्णालयात त्यांना दाखल केले असताना डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
पावसामुळे कोकणातील पर्यटनाला ब्रेक....
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटनला ब्रेक लागला आहे. त्यामुळे पर्यटन व्यवसायिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. मे महिन्याच्या उत्तरार्धात सिंधुदुर्ग जिल्ह्यातल पर्यटन तेजीत असतं. मोठ्या प्रमाणात पर्यटक कोकणात दाखल होतात. मात्र 20 मे पासूनच पावसाला सुरुवात झाल्याने कोकणातील पर्यटनाला पूर्णपणे ब्रेक लागला असून पर्यटन व्यवसाय पूर्णपणे थांबला आहे. सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाणारी होडी वाहतूक सुद्धा बंद ठेवण्यात आली आहे.