डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थात पार्टीने अनुसूचित जातीच्या उन्नतीसाठी अ ब क ड नुसार उपवर्गाचा अभ्यास अहवाल तयार केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मातंग समाजाच्या विविध मागण्याच्या अनुषंगाने 25 मार्च 2023 ला मुंबईत बैठक झाली होती. त्या बैठकीनंतर बार्टी अंतर्गत समिती स्थापन करण्यात आली होती. त्या समितीने अभ्यास करून आपला अहवाल सादर केला आहे. 1961 - 2019 या काळातील अनुसूचित जातीच्या लोकसंख्येचा अभ्यास करण्यात आला आहे.
या अहवालामध्ये महारजातीची लोकसंख्या एकूण लोकसंख्येच्या 62%, मातंग जातीचे 19%, चर्मकार जातीचे 10.9% तर वाल्मिकी मेहकर समाजाचे 3.2 टक्के असल्याचे लक्षात आलं आहे. पण अभ्यासांत 59 जातीच्या लोकसंख्येमध्ये मोठी तफावत आढळून आली आहे. सध्या देशभरामध्ये जातनिहाय जनगणनेची मागणी होत असतानाच असा जातनिहाय जनगणनेवर आधारित अहवाल आला आहे. पहिलाच अहवाल धक्कादायक आहे. या अहवालात 59 जातीच्या लोकसंख्येमध्ये मोठी तफावत आढळून आली आहे.