Beed News: बीडमध्ये भीषण अपघात! भरधाव कंटेनरने चिरडल्याने 6 जणांचा मृत्यू; पायी देवदर्शनाला जाताना अनर्थ..

महामार्गावर भरधाव कंटेनरने सहा जणांना चिरडल्याची घटना घडली आहे. यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Dhule Solapur Highway Accident:  धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर  बीड शहराजवळील नामलगाव फाटा येथील उड्डाणपुलाजवळ सकाळी साडेसातच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले होते. मात्र बीड जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान एकाचा मृत्यू झाला. त्यामुळे अपघातातील मृत्यूचा आकडा सहा झाला आहे.

भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरने पायी चालणाऱ्या सहा जणांना चिरडले. धुळे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील बीड तालुक्यातील नामलगाव फाटा येथील एसआर जीनिंग जवळ आज सकाळी साडेसातच्या सुमारास भीषण अपघात झाला. भरधाव कंटेनरने सहा जणांना चिरडले, या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून दोघांचा उपचारदरम्यान मृत्यू झाला आहे. या अपघातात एकूण सहा जणांचा मृत्यू झाला असून मयत हे बीड तालुक्यातीलच आहेत. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

बीड येथील दिनेश दिलीप पवार (रा.माऊली नगर बीड), पवन शिवाजी जगताप (रा.अंबिका चौक बीड), अनिकेत रोहिदास शिंदे (रा.शिदोड ता.बीड), किशोर गुलाब तोर (बाभूळतारा ता.गेवराई), आकाश अर्जुन कोळसे (रा.रिलायन्स पंप परिसर बीड), विशाल श्रीकिसन काकडे वय 22 रा. शेकटा ता.शेगाव) हे पायी चालत पेंडगाव येथे मारुतीरायाच्या दर्शनासाठी जात होते.

बीड ते पेंडगाव असा पायी प्रवास करत असताना धुळे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील नामलगाव येथील उड्डाणपूल पास करून पुढे असलेल्या एसआर जीनिंगजवळ चालत असताना पाठीमागून भरधाव आलेल्या कंटेनरने सहाही जणांना चिरडले. यात चौघांचा जागीच तर दोघांचा उपचारदरम्यान मृत्यू झाला. कंटेनरच्या दोन चालकांना बीड ग्रामीण पोलीस ठाण्यातील पोलिसांनी ताब्यात घेतले. अपघातातील मृतदेह जिल्हा रुग्णालयात असून या घटनेने जिल्हा हळहळला आहे. महामार्गाला सर्विसरोड नसल्यामुळे असे अपघात सातत्याने होत आहेत.

Advertisement

Maratha Reservation: मराठा आंदोलनामुळे प्रशासन दक्ष! मुंबईतील सर्व पोलिसांच्या सुट्ट्या रद्द

Topics mentioned in this article