जाहिरात

Beed FDA Raid: पनीर, खवा नव्हे विष खाताय! FDA च्या धडक कारवाईने राज्यात खळबळ; तुम्हीही व्हा अलर्ट

सॅफोलाइटचा मुख्य वापर टेक्सटाईल आणि कापड उद्योग: कपड्यांना रंग देण्यासाठी, छपाई करण्यासाठी आणि कापडावरील अतिरिक्त रंग काढण्यासाठी याचा प्रामुख्याने वापर केला जातो.

Beed FDA Raid: पनीर, खवा नव्हे विष खाताय! FDA च्या धडक कारवाईने राज्यात खळबळ; तुम्हीही व्हा अलर्ट

Beed FDA Action News:  अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी बीडच्या शिरुर तालुक्यातील दहीवंडी येथे टाकलेल्या धाडीत खळबळजनक प्रकार समोर आला आहे.. दहीवंडी येथील जय श्री कृष्णा केक ॲन्ड बफ र्ी या उत्पादन केंद्रात कारवाई केली असता त्या ठिकाणी खवा, पनीर हे चमकदार होण्यासाठी घातक अशा सॅफोलाईटची भेसळ केली जात होती.

या ठिकाणाहून तब्बल 35 हजार 536 रुपयांचा मिल्क केक, बर्फी व अन्य अन्नपदार्थ घटनास्थळीच नष्ट करण्यात आले असून, संबंधित व्यावसायिकाविरुद्ध अन्न सुरक्षा कायद्यासह भारतीय न्याय संहितेअंतर्गत शिरुर पोलिस ठाण्यात मालक कार्तिक सवाईसिंग राजपुरोहित  याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासणीत जप्त करण्यात आलेला 35 हजार 536 रुपयांचा मिठाई व कच्च्या मालाचा साठा कमी दर्जाचा, असुरक्षित व भेसळयुक्त असल्याच्या संशयावरून तसेच अस्वच्छ व अयोग्य साठवणुकीमुळे नाशवंत असल्याने घटनास्थळीच खोल खड्ड्यात टाकून नष्ट करण्यात आला. याशिवाय व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

Siya Goyal: पोलीस कोठडीतही माज! सियाचे अश्लील हावभाव; कॅमेऱ्यासमोर केलं असं कृत्य; संतापजनक VIDEO

काय आहे सॅफोलाईट?

सॅफोलाइट ज्याला रासायनिक भाषेत सोडियम फॉर्मल्डिहाइड सल्फॉक्सीलेट  किंवा रॉन्गालाइट असे म्हणतात, हे प्रामुख्याने औद्योगिक वापरासाठी असलेले एक शक्तिशाली रासायनिक द्रव्य आहे. सॅफोलाइटचा मुख्य वापर टेक्सटाईल आणि कापड उद्योग: कपड्यांना रंग देण्यासाठी, छपाई करण्यासाठी आणि कापडावरील अतिरिक्त रंग काढण्यासाठी याचा प्रामुख्याने वापर केला जातो.

आरोग्यावरील दुष्परिणाम आणि भेसळ : सॅफोलाइट हा मानवी आरोग्यासाठी अत्यंत घातक आणि विषारी पदार्थ आहे. दुग्धजन्य पदार्थ जसे की खवा, पनीर यासारखे पदार्थ नष्ट करण्यात आले.

Mumbai Rain LIVE: मुंबई, ठाण्यात पावसाची जोरदार बॅटिंग! वाहतुकीवर मोठा परिणाम; वाचा LIVE अपडेट

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com