Beed News: वाल्मिक कराड भोवती फास आवळला, मुलगाही अडकला? 'त्या' जबाबाने खळबळजनक ट्वीस्ट!

महादेव मुंडे हत्या प्रकरणात बाळा बांगरचा गुप्त जबाब नोंदवण्यात आला आहे. या जबाबामुळे वाल्मिक कराडच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

आकाश सावंत, बीड:

Beed Mahadev Munde Murder Case:  बीडच्या परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणाला दोन वर्ष उलटले आहेत. दोन वर्षानंतरही या प्रकरणात अद्याप एकालाही अटक झाली नाही. या संपूर्ण प्रकरणाची एसआयटीने सहा महिन्यांत 200 लोकांची कसून चौकशी केली. यासाठी 500 पेक्षा अधिक लोकांची कॉल डिटेल तपासणी करण्यात आली. तब्बल12 जणांच्या मानसशास्त्रीय तपासण्या केल्या गेल्या, अशातच या प्रकरणी एक महत्त्वाचा जबाब नोंदवण्यात आला आहे.

बीड महादेव मुंडे हत्या प्रकरणात मोठी अपडेट! 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, बीडमधील महादेव मुंडे हत्या प्रकरणाच्या तपासाला आता वेग आला आहे. काही दिवसांपूर्वीच महादेव मुंडे हत्या प्रकरणात दोघांची नार्को टेस्ट आणि एकाची ब्रेन मॅपिंग चाचणी करण्यात आली होती. या हत्या प्रकरणात वाल्मिक कराड हाच मुख्य  आरोपी असल्याचा संशय व्यक्त होत आहे. अशातच आता एक सर्वात मोठी अपडेट समोर आली असून महादेव मुंडे हत्या प्रकरणात बाळा बांगरचा गुप्त जबाब नोंदवण्यात आला आहे. या जबाबामुळे वाल्मिक कराडच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

Beed Crime: महाराष्ट्राला हादरवणाऱ्या बीड हत्याकांडात मोठी अपडेट! दोघांची 'नार्को', एकाची 'ब्रेन मॅपिंग टेस्ट

बाळा बांगरच्या जबाबाने वाल्मिक कराड अडकणार..

 महादेव मुंडे हत्या प्रकरणात यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांच्यासह विजयसिंह उर्फ बाळा बांगर यांचे देखील जबाब झाले आहेत. 164 नुसार विजयसिंह उर्फ बाळा बांगर यांचा महत्त्वाचा जबाब झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.  या जबाबामध्ये वाल्मीक कराड आणि वाल्मीक कराडच्या मुलाचे देखील नाव असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यामुळे हा जबाब देखील अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. दरम्यान आजच या प्रकरणातील दोन संशयितांची नार्कोटेस्ट देखील होत आहे. यातून आता एसआयटीच्या हाती नेमकं काय लागतं याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, परळीतील तहसील कार्यालयासमोर 20 ऑक्टोबर 2023 रोजी महादेव मुंडे याची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. या हत्या प्रकरणाने राज्यभरात खळबळ उडाली. मात्र 2023 पासून या प्रकरणात कोणतीही अटक करण्यात आली नव्हती. याप्रकरणी महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वर मुंडे यांनी वारंवार आंदोलन करत सरकारचे लक्ष वेधले, ज्यानंतर या प्रकरणाचा तपास वेगाने सुरु झाला. 

Doctor Death: मृत्यूपूर्वी घेतलेली एक सही आणि 60 कोटींचा बंगला; हायप्रोफाईल डॉक्टरच्या मृत्यूचे गूढ वाढले