जाहिरात

Beed Crime: महाराष्ट्राला हादरवणाऱ्या बीड हत्याकांडात मोठी अपडेट! दोघांची 'नार्को', एकाची 'ब्रेन मॅपिंग टेस्ट

वैज्ञानिक प्रयोगशाळेत दोघांची नार्को टेस्ट तर एकाची ब्रेन मॅपिंग चाचणी होणार आहे. यापूर्वी तिघांची नार्को चाचणी पूर्ण झाली आहे. आज उर्वरित तिघांपैकी दोघांची नार्को आणि एकाची 'ब्रेन मॅपिंग' केली जाणार आहे.

Beed Crime: महाराष्ट्राला हादरवणाऱ्या बीड हत्याकांडात मोठी अपडेट! दोघांची 'नार्को', एकाची 'ब्रेन मॅपिंग टेस्ट

आकाश सावंत, बीड:

Beed Mahadev Munde Murder Case:  संपूर्ण राज्याला हादरवणाऱ्या बीडमधील महादेव मुंडे खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे.  महादेव मुंडे खून प्रकरणी आज दोघांची 'नार्को', एकाची 'ब्रेन मॅपिंग' चाचणी होणार आहे. या हत्या प्रकरणात वाल्मिक कराड हाच मुख्य आरोपी असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. आता या वैज्ञानिक चाचणीने तपासाला वेग येणार आहे. 

महादेव मुंडे हत्या प्रकरणात मोठी अपडेट 

परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांच्या निघृण खून प्रकरणाला दोन वर्षांहून अधिक काळ लोटला असून, आता या प्रकरणाचा तपास अंतिम टप्प्यात पोहोचला असल्याची माहिती समोर आली आहे. आयपीएस पंकज कुमावत यांच्या नेतृत्वाखालील एसआयटीने आता वैज्ञानिक चाचण्यांवर लक्ष केंद्रित केले असून, आज मुंबईच्या न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळेत दोघांची नार्को टेस्ट तर एकाची ब्रेन मॅपिंग चाचणी होणार आहे. यापूर्वी तिघांची नार्को चाचणी पूर्ण झाली आहे. आज उर्वरित तिघांपैकी दोघांची नार्को आणि एकाची 'ब्रेन मॅपिंग' केली जाणार आहे.

Doctor Death: मृत्यूपूर्वी घेतलेली एक सही आणि 60 कोटींचा बंगला; हायप्रोफाईल डॉक्टरच्या मृत्यूचे गूढ वाढले

दोघांची नार्को अन् ब्रेन मॅपिंट टेस्ट होणार

या संपूर्ण प्रकरणाची एसआयटीने सहा महिन्यांत 200 लोकांची कसून चौकशी केली. यासाठी 500 पेक्षा अधिक लोकांची कॉल डिटेल तपासणी करण्यात आली. तब्बल12 जणांच्या मानसशास्त्रीय तपासण्या केल्या गेल्या. आत्तापर्यंत वैज्ञानिक चाचण्या करण्यात आलेल्या या खून प्रकरणाचे महत्त्वाचे साक्षीदार असल्याची माहिती  समोर आली आहे. यात सर्व चाचण्यांचे अहवाल आल्यानंतर खुनाचा उलगडा होण्याची शक्यता आहे. याप्रकरणी संशयित गोट्या गीतेचा तपास अद्याप सुरुच आहे. 

दरम्यान, 20 ऑक्टोबर 2023 रोजी महादेव मुंडे याची परळीतील तहसील कार्यालयासमोर अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. या हत्या प्रकरणाने राज्यभरात खळबळ उडाली. मात्र 2023 पासून या प्रकरणात कोणतीही अटक करण्यात आली नव्हती. याप्रकरणी महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वर मुंडे यांनी वारंवार आंदोलन करत सरकारचे लक्ष वेधले, ज्यानंतर या प्रकरणाचा तपास वेगाने सुरु झाला. 

Satara News : अल्पवयीन मुलीचं व्हेलेंटाइन डेला अपहरण; पुण्यातून बाबांना फोन, CCTV मुळे लेकीचा कारनामा उघड

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com