आकाश सावंत, बीड: मस्सजोगचे सरपंच सरपंच देशमुख हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी वाल्मीक कराड याला बीड जिल्हा कारागृहात व्हीआयपी ट्रीटमेंट दिल्याचा गंभीर आरोप झाला आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू होण्या अगोदरच कारागृह प्रशासनात मोठा बदल करण्यात आला असून, सध्याचे कारागृह अधीक्षक बक्सार मुलांनी यांची तातडीने बदली करण्यात आली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
समोर आलेल्या माहितीनुसार, बडतर्फ पोलीस अधिकारी रणजीत कासले याला आठवडाभरापूर्वी जामीन मिळाला होता. जामीनावर सुटका झाल्यानंतर रणजित कासलेने सोशल मीडियावर काही व्हिडिओ शेअर करत वाल्मीक कराडबाबत धक्कादायक दावे केले आहेत. जेलमध्ये वाल्मीक कराडला कारागृहात व्हिआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचा आरोप केला आहे. याआधीही वाल्मीक कराडला जेलमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचे आरोप करण्यात आले होते.
अशातच या प्रकरणाची चौकशी सुरू होण्या अगोदरच कारागृह प्रशासनात मोठा बदल करण्यात आला असून, सध्याचे कारागृह अधीक्षक बक्सार मुलांनी यांची तातडीने बदली करण्यात आली आहे. बक्सार मुलानी हे गेल्या तीन वर्षापासून बीडमध्ये कार्यरत होते त्यांचा तीन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने ही बदली झाल्याची माहिती आहे. परंतु कारागृह प्रशासनावर झालेले आरोप आणि त्यानंतर झालेली ही बदली याची आता चर्चा होऊ लागली आहे.
नक्की वाचा - Monsoon news: मान्सून 12 दिवस आधीच महाराष्ट्रात दाखल,'या' भागात मुसळधार पावसाची शक्यता
दरम्यान, जेलमध्ये वाल्मीक कराडला स्पेशल चहा दिला जातो. त्याला तीन लेअरच्या खास चपात्या दिल्या जातात. महत्त्वाचं म्हणजे वाल्मीक कराड स्वत:सह इतर कैद्यांच्या नावावर 25000 हजाराची कॅन्टीन खरेदी करतो. कारागृहातील इतर कैद्यांना पांघरायला कपडे असतात तर वाल्मीकला मात्र 6 ब्लॅकेंट्स दिले जातात, असे गंभीर आरोप रणजीत कासलेने गेले होते.