हेअरकट- शेविंग करायला जाताय? मग थांबा! त्या आधी खिसा तपासा, त्या मागचे कारण तुम्हाला माहित आहे का?

दरम्यान आजच्या दिवसाची सुरूवातच सर्व सामान्यांना महागाईचा धक्का देणारी ठरली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • महाराष्ट्र नाभिक महामंडळाने सलून सेवांच्या दरात तब्बल 20 टक्के वाढ जाहीर केली आहे
  • LPG च्या दरात जवळपास 29 रुपयांची वाढ झाली असून, गेल्या तीन महिन्यात एकूण 89 रुपयांची वाढ नोंदवली गेली आहे
  • वाढलेले इंधन दर, महागडी सौंदर्यप्रसाधने आणि व्यवसाय खर्च यामुळे सलून दरवाढ अपरिहार्य झाली होती
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
बीड:

आकाश सावंत 

Beed News: रविवार म्हटला की लोकांची पावलं सलूनकडे आरोआप वळतात. त्यामुळे सलून बाहेर रांगा किंवा गर्दी दिसते. पण आजचे चित्र मात्र काही वेगळे होते. लोक रविवार सकाळी उठले त्यावेळी त्यांनी LPG महाग झाल्याचा शॉक लागला. घरगुती वापराच्या गॅसमध्ये जवळपास 29 रूपयांनी वाढ झाली. त्यातून सावरत त्यांनी सलून गाठले. पण तिथली ही स्थिती काही वेगळी नव्हती. देशात महागाईचा भडका उडाला असताना नाभिक महामंडळाने ही 20 टक्के दरवाढ जाहीर केली आहे. त्यामुळे गेल्या पावली अनेक जण घरी परतल्याचे चित्र पाहायला मिळालं. 

महागाईचा फटका आता शेविंग पासून हेअर कटींगपर्यंत बसला आहे. सलूनमध्ये जाणाऱ्या ग्राहकांना आज मोठा झटका बसला आहे. महाराष्ट्र नाभिक महामंडळाने सलून सेवांच्या दरात तब्बल 20 टक्के वाढ केली आहे. त्यामुळे बीडमध्ये अनेक ग्राहकांनी सलूनकडे पाठ फिरवल्याचं चित्र दिसत आहे. वाढते इंधन दर, महागडी सौंदर्यप्रसाधने आणि वाढलेला व्यवसाय खर्च यामुळे दरवाढ अपरिहार्य असल्याचं सलून चालकांचं म्हणणं आहे. पेट्रोल डिझेल वाढल्याने त्याच्यावर अवलंबून असलेल्या गोष्टीही आपोआप वाढल्या आहेत. त्यामुळे ही दरवाढ करणे गरजेचे असल्याचं नाभिक महामंडळाने स्पष्ट केलं आहे.   

Advertisement

नक्की वाचा - LPG price hike: महागाईचा भडका! सिलिंडर 29 रुपयांनी महाग, महाराष्ट्रातला दर किती?

आधीच महागाईने होरपळलेल्या ग्राहकांना हा नवा आर्थिक फटका असह्य ठरत आहे. त्यांनी या गोष्टींचा नाईलाज असल्याचं सांगितलं आहे. परवडत नसलं तर करणार काय असं ग्राहक बोलत आहेत. ही दरवाढ सर्व सामान्यांना परवडणारी नाही. पण सलून चालक तरी काय करणार असा ही प्रश्न काही ग्राहकांनी केला आहे. दर वाढ फार मोठी नसून थोडी आहे असा दावा ही सलून कर्मचाऱ्यांनी केला आहे. तिथे काम करणारे कर्मचारी ते सलून मधील वेगवेगळी साधनं यांचे दर वाढले आहेत. त्यामुळे दरवाढ गरजेची आहे असं ही त्यांनी सांगितलं. काहींनी या दरवाढीचे समर्थन केले आहे तर काहींनी विरोध दर्शवला आहे. तर काहींचा नाईलाज झाला आहे. 

नक्की वाचा - LPG Price Hike : LPG नंतर PNG च्या किमतीही वाढणार? स्वयंपाकाच्या गॅसबाबत सरकारचा प्लान काय आहे?  

दरम्यान आजच्या दिवसाची सुरूवातच सर्व सामान्यांना महागाईचा धक्का देणारी ठरली आहे.  सर्व सामान्यांच्या खिशाला आज पुन्हा चाट पडली आहे. स्वयंपाकाचा गॅस सिलिंडर जवळपास 29 रूपयांनी महाग झाला आहे. त्याचे नवे दर आजपासून लागू झाले आहे. त्याचा थेट बोजा सर्व सामान्यांच्या खांद्यावर पडणार आहे. विशेष म्हणजे गेल्या तीन महिन्यात सिलिंडरच्या दरात 89 रुपयांची वाढ झाली आहे. ही वाढ अशीच होत राहीली तर सर्व सामान्यांनी करायचे काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.