आकाश सावंत
मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट उधळवून लावण्यात आला. त्यानंतर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. जरांगेंनी या मागे धनंजय मुंडे असल्याचा आरोप केला होता. तर मुंडेंनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. तर या प्रकरणात दोघांना अटक करण्यात आली आहेत. त्यातील एक आरोपी अमोल खुणेच्या बचावासाठी त्याची पत्नी समोर आली होती. शिवाय आपल्या पतीला कसे फसवले जात आहे याचा दावा तिने केला होता. त्यात आता दुसरा आरोपी विवेक गरूड याबाबतही एक गोष्ट समोर आली आहे. याबाबतचा ठोस दावा करुणा मुंडे शर्मा यांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणात ट्वीस्ट निर्माण झाला आहे.
मनोज जरांगे यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी विवेक गरुड याला अटक करण्यात आला आहे. या गरूड बाबतचा एक मोठा खुलासा करुणा मुंडे शर्मा यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्याने एकच खळबळ उडाली आहे. करुणा शर्मा यांनी सांगितले की, महिनाभरापूर्वी विवेक गरुडने मला फोन केला होता. शिवाय आपल्याला भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर तो माझ्याकडे तीन वेळा आला. त्या भेटीत त्याने मला धनंजय मुंडे यांची ऑडिओ क्लिप ऐकवली. तो म्हणाला की, जर धनंजय मुंडे यांनी मला पैसे दिले नाहीत, तर मी या सर्व ऑडिओ क्लिप तुम्हाला देईन. या ऑडिओ क्लिपमध्ये जरांगे यांच्या हत्येबाबतचा ठोस पुरावा असल्याचा दावाही करूणा मुंडे शर्मा यांचा आहे.
शर्मा पुढे म्हणाल्या की, मी त्याला सांगितले की तू दे, पण त्याला माझ्याकडून काही पैशांची अपेक्षा होती. त्याचवेळी तो स्वतःला मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत असल्याचे सांगत होता. तसेच जरांगे पाटील यांच्या आतल्या टीममध्ये फूट पडली आहे, असेही तो बोलला असल्याचा दावा करुणा शर्मा यांनी केला आहे. या दाव्यांनंतर संपूर्ण घटनेचा नवा पैलू समोर आला आहे. आधीच मनोज जरांगे पाटील यांच्या जीवावर बेतलेल्या कटाच्या तपासात अनेक राजकीय धागेदोरे समोर येत असताना आता करुणा शर्मा यांच्या विधानामुळे तपासाची दिशा बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, करुणा शर्मा यांनी या प्रकरणात पोलिसांना सर्व माहिती देण्याची तयारी दर्शवली आहे. गरुडच्या भेटींचे काही पुरावे त्यांच्या जवळ असल्याचेही त्यांनी सूचित केले आहे. या खुलाशामुळे बीड तसेच राज्याच्या राजकीय वर्तुळात नवीन चर्चा सुरू झाली आहे.
नक्की वाचा - Two wheeler Toll: दुचाकीला टोल का द्यावा लागत नाही? 99 टक्के लोकांना कारणच माहित नाही
दरम्यान या प्रकरणी अमोल खुणे याला ही अटक करण्यात आली आहे. हा अमोल खुणे एकेकाळी मनोज जरांगे पाटील यांचा खंदा समर्थक होता. त्याला अटक केल्यानंतर त्याची पत्नी माध्यमांसमोर आली होती. शिवाय तिने हे सर्व आरोप फेटाळले होते. आपला पती निर्दोष असल्याचं तिने सांगितलं होतं. त्याला दारू पाजून चुकीची गोष्ट करण्यास भाग पाडल्याचा दावाही तिने केला होता. त्यातूनच त्यांच्या तोंडून काही चुकीची वाक्य गेल्याचं ही ती म्हणाली होती. त्यात आता विवेक गरुड याच्या ऑडीओ क्लिपबाबत करुणा मुंडे शर्मा यांनी नवा दावा केला आहे. त्यामुळे या प्रकरणाला वेगळेच वळण लागतं की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. शिवाय त्या ऑडिओ क्लिपमध्ये काय होतं याबाबतही उत्सुकता निर्माण झाली आहे.