Beed News: मस्साजोगमध्ये सरपंच पोटनिवडणूक! संतोष देशमुखांची पत्नी रिंगणात, गावकऱ्यांचा निर्णय काय?

संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर मस्साजोग हे गाव संपूर्ण राज्याला परिचयाचे झाले.

जाहिरात
Read Time: 2 mins
बीड:

आकाश सावंत 

संतोष देशमुख यांच्या हत्येनं सर्वच महाराष्ट्र हळहळला होता. संतोष देशमुख हे मस्साजोगचे सरपंच होते. त्यांच्या हत्येनंतर मस्साजोगचे सरपंचपद हे रिक्त झाले होते. तिथे आता पोटनिवडणुकीची घोषणा झाली आहे. त्यामुळे सरपंचपदासाठी पोटनिवडणूक होणार आहे. या निवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नी सरपंचपदासाठी उभ्या राहणार आहेत. यांच्या उमेदवारीमुळे संपूर्ण ग्रामस्थ काय निर्णय घेतात याकडे ही सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यात संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय यांनी वहीनीच सरपंच होणार असा दावा केला आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे ही संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.  

बीडमध्ये पुन्हा एकदा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. जिल्ह्यातील 88 ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुका प्रक्रिया पार पडत आहे. यासाठी आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रीया सुरू झाली आहे. 13 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहेत. मात्र सर्वांचे लक्ष मस्साजोगच्या सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीकडे लागले आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर रिक्त झालेल्या या पदासाठी आता नवे समीकरण समोर येत आहे. 

Advertisement

नक्की वाचा - ठाणे ते बोरिवली...! देशातील सर्वात लांब बोगदा; दीड तासांचा प्रवास 15 मिनिटात, 11 KM मार्ग कसा असेल?

संतोष देशमुख यांच्या पत्नी आणि धनंजय देशमुख यांच्या वहिनी यांना सरपंचपदासाठी रिंगणात उतरवण्याचा निर्णय कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी घेतला आहे. विशेष म्हणजे गावकऱ्यांचा त्यांना बिनशर्त पाठिंबा असल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यामुळे मस्साजोगमध्ये ही निवडणूक बिनविरोध होण्याच्या हालचाली वेगाने सुरू झाल्याची माहिती संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी दिली आहे. गावाचा पुढचा कारभारी कोण होणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. गावाने निर्णय घेतला आहे. त्यामुळे वहीनीच सरपंच होणार हे नक्की आहे असा दावा धनंजय देशमुख यांनी केला आहे. 

नक्की वाचा - Cabinet Decision: राज्य मंत्रिमंडळाचे 5 मोठे निर्णय! राज्याला मिळणार स्वतंत्र 'AI' विभाग

संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर मस्साजोग हे गाव संपूर्ण राज्याला परिचयाचे झाले. संतोष देशमुख यांची अतिशय क्रुरपणे हत्या करण्यात आली होती. त्याचे पडसाद राज्याच्या राजकारणात उमटले होते. धनंजय मुंडे यांना या प्रकरणात राजीनामा ही द्यावा लागला होता. मुंडे यांचे जवळचे समजले जाणारे वाल्मिक कराड यांना ही जेलची हवा खावी लागली आहे. या प्रकरणातील सर्व आरोपी हे सध्या जेलमध्ये आहे. हत्येचा खटाला लांबला आहे. एक आरोपी अजूनही फरार आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता ही निवडणूक होत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राज्याचे लक्ष मस्साजोगकडे लागले आहे.