बीड: शिरूर तालुक्यातील आरोपी सतीश उर्फ खोक्या भोसले सध्याला पोलीस कोठडीमध्ये आहे त्याचे पोलीस कोठडीमध्ये अन्नत्याग आंदोलन सुरू आहे तर दुसरीकडे त्याच्या कुटुंबातील नातेवाईकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे यामध्ये सतीश उर्फ खोकला भोसले ची पत्नी बहीण आणि काही नातेवाईकांनी आमरण उपोषणांमध्ये सहभाग नोंदवला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
अज्ञात लोकांकडून आमचं घर जाळण्यात आले. त्यांच्यावरती कार्यवाही करण्यात यावी त्याचबरोबर बावी येथील ढाकणे पिता पुत्रांनी आम्हाला चुकीची वागणूक देऊन आम्हाला मारहाण केली त्यांच्यावरती गुन्हा दाखल आहे. मात्र त्यांना तात्काळ अटक करावी. त्याचबरोबर वनविभागाने अति घाई करून आमचं घर पाडलं आम्हाला रस्त्यावरती आणले. आमची लेकरं रस्त्यावरती आले आम्हाला न्याय मिळावा अशी विनंती या उपोषणांमध्ये सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या पत्नीने केली आहे.
दरम्यान, बीडच्या खोक्या भाईनंतर आता हिंगोलीत देखील एका वाळू माफियाने रिल्सद्वारे दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला आहे, भाऊ राठोड असे या रिल्स बनवणाऱ्या व्यक्तीचे नाव असून हा व्यक्ती गळ्यात सोन्याची चैन आणि बोटांमध्ये सोन्याच्या अंगठ्या घालून समोर असलेल्या टेबलवर पैशाचे बंडल ठेवून रिल्स बनवून सोशल मीडियावर टाकण्यात आले होते. दरम्यान या व्यक्तीसोबत पोलीस खात्यातील अधिकाऱ्यासोबत बैठकीची देखील रिल्स समोर आली आहे.
नक्की वाचा - Akola Crime : पती मंगळसूत्र वाचवायला गेला मात्र पत्नीचं कुंकूच पुसलं; महिलेचा आक्रोश...
सेनगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध रेती उपसा सुरू आहे या संदर्भात अनेकदा आंदोलने देखील करण्यात आली होती, मात्र याकडे पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे. हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यात वाळू माफियांकडून हैदोस सुरू असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केलाय. दरम्यान हिंगोली जिल्ह्याचे बीड होऊ देऊ नका.. अशी मागणी नागरिकांनी पोलीस अधीक्षकांना निवेदनाद्वारे केली आहे.