Beed News: बीडमध्ये हिंदू- मुस्लिम एकतेचे दर्शन! किर्तन, कव्वालीच्या कार्यक्रमात एकत्र, पहलगाम हल्ल्याचा निषेध

Beed News: हिंदू मुस्लिम बांधवांची हजेरी लावले. यावेळी दोन्ही समाज बांधवांकडून पहलगाम घटनेचा कडाडून निषेध करण्यात आला. 

जाहिरात
Read Time: 2 mins

अक्षय सावंत, बीड: पहलगाममध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा तणाव वाढला आहे. या हल्ल्याला चोख प्रत्यूत्तर देऊ असा इशारा भारताकडून देण्यात आला आहे. या हल्ल्यात फक्त हिंदूंनाच टार्गेट करण्यात आल्याने मुस्लिम बांधवांविरोधात वादग्रस्त विधान केले जात आहेत. अशातच बीडमध्ये मात्र हिंदू- मुस्लिम एकतेचे दर्शन झाले, ज्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

(NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, पहलगाम हल्ल्यानंतर बीडच्या आष्टीत हिंदू मुस्लिम एकतेचं दर्शन पाहायला मिळाले. आष्टीमध्ये कीर्तन, कव्वालीच्या कार्यक्रमाला गावातील हिंदू मुस्लिम बांधवांची हजेरी लावले. यावेळी दोन्ही समाज बांधवांकडून पहलगाम घटनेचा कडाडून निषेध करण्यात आला. 

बीडच्या आष्टी तालुक्यातील दौलावडगाव येथील हिंदू मुस्लिम बांधव एकत्रतेचे प्रतिक असलेल्या पिरबाबा व दक्षिण मुखी मारुतीरायायच्या यात्रेच्या सांगते वेळी किर्तन, कव्वालीचा कार्यक्रम घेण्यात आला. यादरम्यान पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या शहीदांना अभिवादन करण्यात आलं. पहिल्यांदाच मुस्लिम धर्मगुरु आणि हिंदू धर्मातील महंत एका व्यासपीठावर येऊन या पहलगाम घटनेचा निषेध करत हिंदू मुस्लिम एकतेचा दर्शन घडवून दिले.

नक्की वाचा - Badlapur News : बदलापूरकरांच्या डोक्याला 'ताप'; रेल्वेच्या तिकीट खिडकीमुळे मनस्ताप

दुसरीकडे, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर विरार पूर्वच्या मानवेल पाडा येथे श्रीमंत योगी प्रतिष्ठान आणि विष्णू विहार वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी परिसरातील रहिवाशांनी  पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला.  या आंदोलनात मोठ्या संख्येने स्थानिक रहिवाशांनी  सहभाग नोंदवला.

Advertisement

 नागरिकांनी काळ्या पट्ट्या बांधून तसेच पाकिस्तानचा निषेध व्यक्त करत होते संताप व्यक्त केला. हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना कठोर शिक्षा करण्याची मागणी यावेळी आंदोलकांनी केली. तसेच पहालगांम दहशतवादी हल्ल्याच्या 12 दिवसानंतरही अतिरेकी हल्लेखोर मोकाट असल्याने सरकारने तत्काळ कठोर कारवाई करावी अशी ही मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी दहशतवादी हल्ल्यात मृत पावलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. 

नक्की वाचा - Crime News : पैशांची हाव, वकिलाने थेट न्यायालय आणि पोलिसांनाच फसवलं; काय आहे प्रकरण?

Topics mentioned in this article