स्वानंद पाटील, प्रतिनिधी
Beed Protest : आपल्या गावात जायला नीट रस्ता नसल्यानं वैतागलेल्या एका प्राध्यापकावर खड्ड्यातल्या चिखलात बसून आंदोलन करण्याची वेळ आली आहे. बीडपासून अवघ्या सहा किलोमीटर असलेल्या नाळवंडी गावातील हे प्राध्यापक आहेत. या गावाला जायला रस्ता नाही. याबाबत वेळोवेळी निवेदन देऊनही काही फायदा झाला नाही. त्यामुळे गावातील प्राध्यापक ज्ञानेश्वर राऊत यांनी हे आंदोलन केलं.
या रस्त्यावरून अनेक गावातील रहिवासी प्रवास करत असतात.बीड नाळवंडी रस्ता गेले पंधरा वर्षापासून झालेला नाही यामुळे गावकऱ्यांसह शाळेतील विद्यार्थी अबाल वृद्धाला याचा त्रास सहन करावा लागतो.असे असतानाही प्रशासन आमदार खासदार पालकमंत्री याकडे लक्ष देत नाहीत यामुळे गावातील प्राध्यापक ज्ञानेश्वर राऊत यांनी रस्त्यावरच्या दोन फूट आपली व्यथा मांडली.
2012 पासून नाळवंडी,जूजगव्हाण, दहिफळ चिंचोली, लक्ष्मीआई तांडा, इत्यादी गावातील समस्त नागरिक, सरपंच, उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य, सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी हे सर्व बीड-नाळवंडी रस्त्याच्या संपूर्ण कामासाठी विविध आंदोलने, मोर्चे, उपोषण, ठिय्या आंदोलन, करत आहेत.मात्र या रस्त्याची परिस्थिती सुधारत नसल्याकारणाने या गावतील नागरिकांचे हाल होत आहेत.
( नक्की वाचा : पालघरमधील 'त्या' विद्यार्थ्यांचा प्रश्न सुटणार, 'NDTV मराठी' च्या बातमीनंतर मुख्यमंत्र्यांचे आदेश )
या आंदोलनानंतरही परिस्थितीमध्ये बदल झाला नाही तर 15 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा राऊत यांनी दिला आहे.