Beed News: प्रतीक्षा संपली! 40 रुपयांत बीडहून अहिल्यानगरला रेल्वेने जा; किती स्टेशन असणार? वाचा सर्व माहिती

Beed - Ahilyanagar Train : यंदाचा मराठवाडा मुक्ती संग्राम दिन (17 सप्टेंबर) बीड जिल्ह्यासाठी खास असणार आहे. त्यांचं एक मोठं स्वप्न त्या दिवशी पूर्ण होणार आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Beed - Ahilyanagar Train : बीड-अहिल्यानगर रेल्वे मार्गावर एकूण 16 स्टेशन आहेत.
बीड:

आकाश सावंत, प्रतिनिधी

Beed - Ahilyanagar Train : यंदाचा मराठवाडा मुक्ती संग्राम दिन (17 सप्टेंबर) बीड जिल्ह्यासाठी खास असणार आहे. त्यांचं एक मोठं स्वप्न त्या दिवशी पूर्ण होणार आहे.  अनेक दशकांपासून प्रतीक्षेत असलेल्या बीड-अहिल्यानगर डेमू रेल्वे सेवेचा लवकरच शुभारंभ त्या दिवशी होत आहे. या रेल्वे सेवेचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे.

तिकीट दर आणि प्रवासाचा कालावधी

या रेल्वेसाठी तिकीट दर फक्त 40 रुपये ठेवण्यात आला आहे, अशी माहिती 'NDTV मराठी' ला सूत्रांनी दिलीय.  यामुळे सर्वसामान्य जनतेला परवडेल असा हा प्रवास असणार आहे. अधिकृत तिकीट दरांची घोषणा लवकरच केली जाईल. ही डेमू रेल्वे 168 किलोमीटरचा प्रवास अंदाजे 5 तास आणि 30 मिनिटांत पूर्ण करेल. कमी खर्चात आणि सुरक्षित प्रवासाचा नवा पर्याय उपलब्ध झाल्यामुळे बीडकरांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

16 स्टेशनवर थांबणार रेल्वे

गेली 25 वर्षांपासून प्रलंबित असलेला बीड-अहिल्यानगर-परळी रेल्वे प्रकल्प गेल्या 2 वर्षांत वेगाने पूर्ण करण्यात आला. बीड शहरातील पालवण चौकात उभारलेले भव्य रेल्वे स्थानक आता प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज झाले आहे. बीड ते अहिल्यानगर या मार्गावर एकूण 16 स्टेशनवर ही रेल्वे थांबणार आहे.

या स्टेशनवर थांबणार रेल्वे

बीड

राजुरी

रायमोह

विगणवाडी

घाटनांदुर

अंमळनेर

बावी

किन्ही

आष्टी

कडा

धानोरा

सोलापूरवाडी

लोणी

नारायणडोह

अहिल्यानगर

( नक्की वाचा : Beed News : बीडमध्ये रेल्वे धावणार! मराठवाडा मुक्तीसंग्रामदिनी बीड-अहिल्यानगर मार्गाचा शुभारंभ )

बीडच्या विकासाला मिळणार गती

17 सप्टेंबर, मराठवाडा मुक्ती संग्राम दिनापासून या ऐतिहासिक प्रवासाला सुरुवात होईल. या रेल्वे सेवेमुळे बीड आणि अहिल्यानगर या दोन महत्त्वाच्या शहरांदरम्यानचा प्रवास अधिक सुलभ, किफायतशीर आणि सुरक्षित होणार आहे. आतापर्यंत बस किंवा खासगी वाहनांवर अवलंबून असलेल्या प्रवाशांना या रेल्वेमुळे मोठा दिलासा मिळेल. व्यापारी, विद्यार्थी, कामगार आणि इतर सर्व वर्गांना या सेवेचा थेट लाभ होईल. ही केवळ एक वाहतूक सुविधा नसून, दशकानुदशके जपलेल्या बीडकरांच्या स्वप्नाची पूर्तता आहे, ज्यामुळे जिल्ह्याच्या विकासाला निश्चितच गती मिळेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.

Advertisement
Topics mentioned in this article