अभय भुते, भंडारा: कुणी काय करावे, हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न असलातरी सार्वजनिक क्षेत्रात वावरताना,एखाद्या शासकीय महत्त्वाच्या पदावर असताना सर्व प्रकारचे भान ठेवूनच व्यवहार करावे लागतात. मात्र, भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील दिघोरी मोठी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी असलेल्या डॉक्टर साहेबांना कुक्कुटपालनाचे वेड लागले लागल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलं आहे. डॉ.चंदू वंजारे असे या डॉक्टरचे नाव असून त्यांनी चक्क प्राथमिक आरोग्य केंद्रातच कोंबड्यांचे संगोपन व अंडी उबविण्याच केंद्रही उघडला आहे.
आरोग्य विभाग तर अत्यंत संवेदनशील आहे.जिथे रुग्ण बरे होण्यासाठी येतात तिथेच कोंबड बाजार मांडून घाणीचे साम्राज्य पसरविले जात असेल,तर मात्र असे छंद इतरांसाठी जीव घेणे ठरू शकतात.या डॉक्टर महाशयांनी 50 ते 60 कोंबड्यांचे कुटुंबच येथे पोसले आहे.त्यांच्या शासकीय निवासस्थानाच्या परिसरात हे कुक्कुटपालन होते.
Solpaur News: डीजेवर नाच नाच नाचला अन् धाडकन कोसळला; तरुणाचा मृत्यू
कोंबड्यांचे खाद्य व त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था सर्वकाही डॉक्टर साहेब जातीने बघतात.एवढच काय तर अंडे उबविण्यासाठी त्यांनी लाईट लावून स्वतंत्र व्यवस्था केली आहे.येथील अंडे वरिष्ठ अधिकाºयांच्या जिभेचेही चोचले पूरवित असल्याचे सांगितले जाते. डॉक्टरांचे कुटुंब असलेले या कोंबड्यांचा वावर रुग्णालयातील रुग्णांच्या खाटावर आणि रुग्णालय परिसरात होतो. ज्याचा त्रास रुग्णांना होत असेल पण साहेबांपुढे बोलणार कोण? कोंबड्यांची विष्ठा आणि अन्य घाणीमुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे.
मग आता आरोग्य सुदृढ करण्यासाठी येणारे रुग्ण खरेच बरे होऊन जात असतील का हा प्रश्न आहे. कोंबड्या पाळणे डॉक्टरांचा छंद असल्याचे समजते. तो कुठे जोपासला पाहिजे, हे त्यांना न समजण्या इतपत ते अविचारी नसावे. रुग्णालयात सर्वत्र घाण, अस्वच्छता आणि साहेब कोंबड्या पाळण्यात व्यस्त हे चित्र जरा चिंतन करण्यास भाग पडणारे आहे.
नक्की वाचा- Sambhaji Bhide News: 'सर्वधर्म समभाव म्हणजे नीचपणा', संभाजी भिडेंचे पुन्हा वादग्रस्त विधान)
आता त्यांच्या वरिष्ठांनीच सांगावे, डॉक्टरांचे हे वागणे बरे आहे का? त्यांना शासकीय इमारतीत हे सर्व करण्याची परवानगी आहे का? दोन दिवसांपूर्वी लाखांदूर पंचायत समितीचे सभापती पुरुषोतम ठाकरे यांनी भेट दिली. हा सर्व प्रकार पाहून ते अवाक झाले. प्रचंड नाराजी व्यक्त करीत त्यांनी कारवाई करावी,अशी मागणी केली.