
वैभव घुगे, नाशिक: सर्वधर्म समभाव म्हणजे नीचपणा आहे. हा प्रकार म्हणजे ना धड स्त्री, ना धड पुरुष म्हणजे नपुंसकपणा आहे, असे विधान शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक, अध्यक्ष संभाजी भिडे यांनी केले आहे. तसेच १५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिन साजरा करु, तिरंगा फडकवू मात्र लाल किल्ल्यावर भगवा फडकवण्यासाठी काम करत राहू, असंही ते म्हणाले. नाशिकमधील एका कार्यक्रमात ते बोलत होते.
काय म्हणाले संभाजी भिडे?
"सर्वधर्म समभाग हा निखळ ना पुरुष ना स्री असा प्रकार म्हणजे नपुंसक. मी पती तू पत्नी हे उलट पाहिजे हे शक्य आहे का? तर नाही म्हणून सर्वधर्म समभाव हा निचपणा, असं संभाजी भिडे म्हणाले. तसेच मी बोललो होतो आंबे खाऊन मूल होतात. आजही मी एक झाड लावलं आहे आंब्याचे. तिथं तुम्ही जाऊ आंबे खाऊ शकता, त्यावर माझा कोर्टात खटला सुरु आहे. असे म्हणत आंब्याच्या वक्तव्याचाही त्यांनी पुनरुच्चार केला.
नवी मुंबई सिडकोने विकले आरक्षित भूखंड; महापालिकेने उचलले कठोर पाऊल
"खग्रास ग्रहाच्या काळात एकदा मनुष्य एखाद्या मंत्राचा जप करेल त्याला त्या मंत्राची शक्ती मिळते. गायत्री मंत्राचा जप शिवाजी महाराज यांनी केला होता, तीन एप्रिल रोजी त्यांना ताप असाह्य झाला तोंडांवाटे पाणी दिलेले शरीरातून बाहेर पडत होतेस शरीर पूर्ण खचले होते. शिवाजी महाराज हे उपस्थितांना म्हणाले आम्ही जातो आमचा काळ झाला.सप्तसिंधू सप्त गंगा मुक्त करा हे त्यांचे शेवटचे शब्द, असंही भिडेंनी यावेळी सांगितले.
दरम्यान, पंधरा ऑगस्ट हा दिवस स्वातंत्र्य दिवस साजरा करू तिरंगा फडकू, पण लवकर दिल्लीच्या लाल किल्ल्यावर भगवा फडकवणार यासाठी काम करा हे आपले काम आहे. सगळ्यांमध्ये सामील होऊ, तिरंगा फडकवू पण डोक्यात हिरोजी फर्जंदने सांगितले ते काम करू, असं आवाहनही संभाजी भिडेंनी यावेळी केले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world