Bharat Gaurav Tourist Train : महाराजांच्या जीवनकार्याचा अनुभव घेण्यासाठी आजपासून विशेष ट्रेन; 5 दिवसांच्या यात्रेचं तिकीट किती आहे?

आज सकाळी 6 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 18 मधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ट्रेनला हिरवा कंदील दिला. 

जाहिरात
Read Time: 2 mins

भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन महामंडळाने (IRCTC) ऐतिहासिक, सांस्कृतिक वारशाला उजाळा देण्यासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्याचा अनुभव देण्यासाठी 'छत्रपती शिवाजी महाराज सर्किट ट्रेन ' या एका विशेष ट्रेनची घोषणा केली आहे. ही यात्रा Bharat Gaurav Tourist Train अंतर्गत आज सोमवारी 09 जून 2025 पासून सुरू होत आहे. याचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेकाला  351 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) ने एक विशेष भारत गौरव ट्रेन प्रवास सुरू केला आहे.

या ट्रेनमधून 700 हून अधिक यात्री प्रवास करत आहेत. गडचिरोली ते गडहिंग्लज अशा सर्व भागातील प्रवाशांचा यात सहभाग आहे. या प्रवाशांना शिवाजी महाराजांचा इतिहास अनुभवायला मिळणार आहे. रायगड, प्रतापगड, लाल महाल असेल किंवा शिवसृष्टीला ही रेल्वे जाणार आहे. यामध्ये कोल्हापूरच्या अंबाबाईचं दर्शन घेता येणार आहे. यासाठी राहण्याची आणि खाण्याची व्यवस्था आयआरसीटीसीनं केली आहे.  

Advertisement

आज सकाळी 6 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 18 मधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ट्रेनला हिरवा कंदील दिला. 

Advertisement

नक्की वाचा - Chhatrapati Sambhajinagar : जगप्रसिद्ध अंजिठा लेणीत तब्बल 200 पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला; नागरिकांमध्ये घबराट

तिकीट दर काय आहेत?

स्लीपर - 13,155
3AC - 19,840
2AC - 27,365

सहल तपशील 

  • सहलीचे नाव: छत्रपती शिवाजी महाराज सर्किटशुभारंभ 
  • दिनांक: 09 जून 202
  • 5कालावधी: 5 दिवस / 6 दिवसांची यात्रा (सकाळी समाप्ती)
  • प्रारंभ व समाप्ती स्थान: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT), 
  • मुंबईप्रवास सुरु व संपण्याचे स्थानकं : दादर, ठाणे

यात्रेचा प्रवासमार्ग 

  • मुंबई (CSMT) – रायगड – पुणे – शिवनेरी – भीमाशंकर – प्रतापगड – कोल्हापूर – पन्हाळा – मुंबई


पाच दिवसांची विशेष यात्रा...
भारत गौरव ट्रेनच्या प्रवासाची सुरुवात रायगड किल्ल्यापासून होणार आहे. जिथं शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला, तिथून या विशेष यात्रेची सुरुवात होणार आहे. यानंतर महाराजांचं बालपण गेलं अशा लाल महाल परिसर पाहता येईल. यानंतर कसबा गणपती आणि पुण्यातील शिवसृष्टी पाहता येईल. यानंतर शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ असलेला शिवनेरी किल्ला, 12 ज्योर्तिलिंगांपैकी एक भीमाशंकर, प्रतापगडाचा दौरा असेल. याशिवाय प्रतापगड, कोल्हापूर आणि पन्हाळ्याचा दौरा करण्यात येणार आहे. 

Advertisement