Bhendwal Bhavishyavani 2025: पावसाबद्दलचे भेंडवळच्या घटमांडणीचे खरे ठरले का खोटे? IMD च्या आधी दिला होता इशारा

Maharashtra Rain Buldhana Bhendwal Bhavishyavani 2025: देशामध्ये नैसर्गिक संपत्तीचं संकट असेल, अशा प्रकारचे संकेत देण्यात आले होते. यामध्ये राज्यातील पावसाबाबत केलेले भाकित खरे ठरले आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

Buldhana Bhendwal Bhavishyavani 2025: जून, जुलै महिन्यात विश्रांती घेतल्यानंतर ऑगस्ट महिन्यात पावसाने थैमान घातले आहे. राज्यभरात पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातला असून अनेक जिल्ह्यांमध्ये पुरस्थिती निर्माण झाली आहे. राज्यभरात सुरु असलेल्या या जलप्रलयानंतर बुलढाण्यातील भेंडवळच्या भाकणुकीत केलेली भविष्यवाणी पुन्हा चर्चेत आली आहे. कारण राज्यातील या जलप्रलयाचा वर्तवलेलं भाकित तंतोतत खरे ठरले आहे. 

काय होती भेंडवळची भविष्यवाणी?

 दरवर्षी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर बुलढाण्यातील भेंडवळमध्ये भविष्यवाणी केली जाते. यावर्षी १ मे रोजी ही भविष्यवाणी करण्यात आली. या भविष्यवाणीमध्ये राज्यात पाऊस चांगला असेल पण पीक साधारण असेल. पावसासोबतच यंदाही अवकाळी पाऊस, पुराचा धोका कायम असेल. देशामध्ये नैसर्गिक संपत्तीचं संकट असेल, अशा प्रकारचे संकेत देण्यात आले होते. यामध्ये राज्यातील पावसाबाबत केलेले भाकित खरे ठरले आहे. 

Bhendwal Prediction : पाऊस, पीक, नैसर्गिक संकटे... भेंडवळच्या घटमांडणीतील अंदाज आले समोर

यंदा पाऊस चांगला आहे. यावर्षी पाऊसपाणी चांगल्या प्रकारे आहे. पहिला महिना साधारण पर्जन्यमान असेल. जुना दुसरा महिना पहिल्या महिन्यापेक्षा भरपूर चांगला पाऊस पडेल. जुलै महिन्यात पाऊस सर्वसाधारण असेल मात्र ऑगस्टच्या महिन्यात भरपूर पाऊस कोसळणार आहे. काही भागात अती पाऊस पडेल. महापुरासारखे संकट येईल, असे भाकित यावेळी वर्तवण्यात आले होते. 

अगदी या भाकिता प्रमाणेच मान्सूनने जून महिन्यापूर्वीच दमदार हजेरी लावत राज्याला झोडपून काढले होते. त्यानंतर पावसाने विश्रांती घेतली होती. जुलै महिन्यात पावसाचा जोर मंदावला होता. मात्र ऑगस्ट महिना उजाडताच पावसाने पुन्हा एन्ट्री केली. सध्या संपूर्ण राज्यात पाऊस कोसळत असून अनेक ठिकाणी पुरस्थिती निर्माण झाली आहे. 

Advertisement

विशेष म्हणजे,  युद्धजन्य परिस्थिती निर्माण होऊन पृथ्वीला त्रास होईल. भूकंप, महापूर अशी नैसर्गिक संकटे असतील, असं भाकितही यावेळी मांडण्यात आलं होते. ते सुद्धा खरे ठरले आहे. त्यामुळे या भाकिताची सध्या सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे. 

Pune Rain: पुण्यात मुळा-मुठा नदीला पूरस्थिती! सोसायटींमध्ये पाणी शिरलं; नागरिकांचे हाल