
Pune Rain News: पुणे शहरातून वाहणाऱ्या मुळा व मुठा या नद्यांमध्ये धरणांतून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग होत आहे. विशेषतः खडकवासला धरणातून तब्बल ४२ हजार क्यूसेक वेगाने पाणी सोडण्यात येत असल्याने नदीकाठच्या भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. याचा सर्वाधिक परिणाम एकतानगर परिसरातील सोसायट्यांवर झाला असून, काल रात्रीपासूनच या सोसायट्यांमध्ये पाणी शिरले आहे.
नागरिक धास्तावलेले असले तरी त्यांनी स्पष्ट भूमिका घेतली आहे की, “दरवर्षी आम्हाला आश्वासनं मिळतात, पण समस्या सुटत नाही. ठोस उपाययोजना न झाल्यास आम्ही घर सोडणार नाही.” नागरिकांच्या या संतप्त भूमिकेमुळे प्रशासनाचे प्रयत्न अडचणीत आले आहेत. दुसरीकडे, धोकादायक पूररेषेच्या आत अशा सोसायट्यांना परवानगी कशी मिळाली, संबंधित बिल्डरला अशी बांधकामे कशी मंजूर झाली याचाही तपास आवश्यक असल्याची मागणी जोर धरत आहे.
School Holidays: पावसाचे तुफान सुरुच! आज, उद्या शाळा- कॉलेज बंद; कुठे कुठे सुट्टी जाहीर? पाहा यादी
दुसरीकडे पिंपरी चिंचवडमधील वसाहतींमध्ये पाण्याचा शिरकाव झाला आहे. पिंपरी चिंचवडच्या विविध भागांतील दोन हजार नागरिकांना स्थलांतरित करण्यात आलंय. मात्र अद्याप ही पवना, इंद्रायणी आणि मुळा नदी पात्रालगतील काही नागरिक जीव धोक्यात घालून राहताना दिसत आहेत.
शहरातील संजय गांधी नगर, लक्ष्मीनगर, भाटनगर, जाधव घाट, किवळे या भागातील वसाहतीत पाण्याने शिरकाव केला आहे.
अनेकांच्या घरात आत्ता ही पाणी साचलेलं आहे. नदीकाठच्या झोपडपट्ट्या मध्ये देखील मोठ्या प्रमाणावर पाणी साचले असून या ठिकाणच्या नागरिकांना पालिकेच्या निवारा केंद्रात स्थलांतरीत करण्यात आले आहे. सध्या पवना धरणातून 15 हजार 700 क्यूसेक इतका विसर्ग सुरु आहे. पावसाचा जोर वाढला तर परिस्थिती आणखी बदलणार आहे.
खडकवासला धरणातून पुन्हा पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे.खडकवासला धरणातून 39 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे भिडे पुलासह नदीपात्रातील रस्ते दुथडी भरून वाहू लागले असून मुळा मुठा नदी काठावर पाणीच पाणी झालं आहे. तसेच नदी काठ परिसरातल्या मंदिरांत देखील शिरले पाणी असून नदीपत्रातील वाहतूक कालपासून पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे.
Mumbai Rains: मुंबईला अतिमुसळधार पावसाचा 'रेड अलर्ट'; IMD च्या इशाऱ्याने धास्ती वाढली
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world