Bhendwal Prediction : पाऊस, पीक, नैसर्गिक संकटे... भेंडवळच्या घटमांडणीतील अंदाज आले समोर

जाहिरात
Read Time: 2 mins

अमोल गावंडे, बुलडाणा

Bhendwal Yatra : दरवर्षी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर जाहीर होणार्‍या भेंडवळ भविष्यवर  राज्यातील सामान्यांसोबतच शेतकर्‍यांचेही लक्ष असते.  आज गुरुवारी भेंडवळ भविष्यवाणीची घोषणा करण्यात आली. यंदाच्या भेंडवळ भविष्यवाणीनुसार, राज्यात पाऊस चांगला असेल पण पीक साधारण असेल. पावसासोबतच यंदाही अवकाळी पाऊस, पुराचा धोका कायम असेल. देशामध्ये नैसर्गिक संपत्तीचं संकट असेल. देशाचा राजा कायम राहील अशा घोषणा करण्यात आल्या आहेत. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

दरम्यान पीक-पाणी, पाऊसमान याचा वेध घेण्यासाठी बुलढाणा आणि आजुबाजूच्या गावातील मंडळी भेंडवळ भविष्यवाणी ऐकायला, पहायला तोबा गर्दी करतात. बुलडाण्यातील जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळ येथे ही यात्र भरवली जाते. 

अनेक वर्षांपासून चालत आलेल्या भेंडवळच्या अंदाजावर विश्वास ठेवून शेतकरी वर्षभराच्या पीक पाण्याचे नियोजन करत असतात. विज्ञानाच्या आधुनिक युगातही ही भेंडवळची परंपरा जपली जात आहे. अनेकदा हे अंदाज खरे ठरले आहेत.

(ट्रेंडिंग बातमी - Leopard attack: आई समोरच चिमुकल्याला बिबट्याने पळवलं, लेकासाठी आईचा पाठलाग,पुढे काय झालं?)

भेंडवळचे अंदाज काय?

  • यंदा पाऊस चांगला आहे. 
  • पहिला महिना साधारण कमी जास्त असेल. 
  • जून दुसरा महिना पहिल्या पेक्षा भरपूर चांगला पाऊस पडेल. 
  • जुलै तिसरा महिना साधारण असेल.
  • ऑगस्ट चौथा महिना भरपूर पाऊस कोसळणार आहे.
  • एकूण सर्वसाधारण पाऊस आहे सार्वत्रिक देशाची पीक परिस्थिती साधारण राहील.
  • काही भागात अती पाऊस, युद्धजन्य परिस्थिती निर्माण होऊन पृथ्वीला त्रास होईल. 
  • भूकंप, महापूर अशी नैसर्गिक संकटे असतील. 

(ट्रेंडिंग बातमी - Nashik News: सिनेस्टाईल थरार! पोलिसांच्या हातावर तुरी देवून पळाला, 12 तासाच्या आता पुन्हा गजाआड झाला)

पिकांचे अंदाज

  • कापूस - सर्वसाधारण
  • ज्वारी पिक - अनिश्चित 
  • तूर पिक - साधारण
  • मुंग पिक - साधारण 
  • उडीद पिक - सर्वसाधारण/ तेजी/ 
  • तिळ पिक  - सर्वसाधारण
  • भादली - रोगराई राहणार
  • बाजरी पिक - चांगले
  • तांदूळ पिक - चांगले/ भावात तेजी
  • मठ पिक - साधारण
  • जवस पिक - साधारण /नासाडी
  • लाख पिक - चांगले /भावत तेजी
  • वाटाणा पिक - साधारण
  • गहू पिक - साधारण 
  • हरबरा- साधारण 
  • करडी – साधारण
  • मसूर - साधारण
  • अंबाडी – साधारण