धाराशिव: कांद्याचे दर कोसळल्याने उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी सरकारने तातडीने पावले उचलायला हवीत, अशी मागणी आता होऊ लागली आहे. धाराशिव जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये कांदा भावात मोठी घसरण सुरू झाली आहे. त्यामुळे बळीराजा हवालदिल झाला असून सरकारने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, कांद्याचे सरासरी दर प्रतिक्विंटल १००० ते ११०० पर्यंत खाली घसरले आहेत. कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. कांदा उत्पादक आर्थिक संकटात सापडला आहे. कांद्याच्या भावात घसरण झाल्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील बळीराजा अडचणीत सापडला आहे. मोठ्या प्रमाणात लाल कांद्याची लागवड करण्यात येत असते.
नक्की वाचा - 3000 रुपयांची पनीर मखनी? मुंबईतील तारांकित हॉटेलमधील बिल सोशल मीडियावर व्हायरल
शेतकर्यांना नगदी उत्पन्न मिळवून देणारे पीक म्हणून लाल कांद्याकडे शेतकर्यांचा कल वाढलेला आहे. असे असले तरी गेल्या आठवड्यापासून कांद्याचे दर कमी होत आहेत त्यामुळे कांद्यासाठी झालेला खर्च सुद्धा विक्रीतून मिळत नसल्याची खंत शेतकऱ्यांनी बोलून दाखवली. भाजप सरकार हे शेतकरी विरोधी आहे अशी खंत ही शेतकरी बाळासाहेब करडे यांनी बोलून दाखवली.
शेतकऱ्यांचे पांढरं सोनं म्हणून ओळख असलेल्या कापसालाही योग्य भाव मिळत नसल्याने कापूस उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. कापसाला भाव न मिळाल्यामुळे शेतकरी कापूस घरातच साठवणूक करून ठेवत आहे. मात्र कापसाला घरात साठवणूक करून ठेवत असल्याने कापसाची गुणवत्ता कमी होत आहे. त्यामुळे विक्री करताना या कापसाला भाव मिळणार का? असा देखील प्रश्न उपस्थित होत आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
नंदुरबार जिल्ह्यात खरीप हंगामात एक लाख 25 हजार हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्रावर कापसाची लागवड करण्यात आली होती परंतु सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडल्याने कापसाच्या मोठ्या नुकसान झाला होता तर त्यातच कापसाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणी सापडला असून कापूस घरात साठवणूक करून ठेवल्यावर अधिक भर देत आहे.