भारतीय युट्यूबर इशान शर्माची एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मुंबईतील एका तारांकित हॉटेलमधील खाद्यपदार्थांच्या किमतीवर मोठी चर्चा सुरू झाली आहे. तारांकित हॉटेलमधील एका शाकाहारी खाद्यपदार्थांचं बिल तब्बल दहा हजारांपर्यंत पोहोचलं. विशेष म्हणजे या बिलावर 'आम्ही सेवा कर आकारत नाही' असा उल्लेख आहे. त्यामुळे सोशल मीडियावर या बिलाची मोठी चर्चा सुरू आहे.
नक्की वाचा - हृदयद्रावक! सरकारी रुग्णालयात उंदीर चावल्याने 10 वर्षांच्या मुलाचा मृत्यू
इशान शर्मा हा एक स्टार्टअप फाऊंडर, युट्यूबर आणि नवउद्यमी आहे. त्याने ट्विटरवरुन एक फूड बिल शेअर केलं आहे. पाच सर्वसामान्य शाकाहारी पदार्थांसाठी हॉटेलने तब्बल दहा हजार आकारले आहेत. यावेळी इशानने पनीर खुर्चान, दाल बुखारा, पनीर मखनी, खस्ता रोटी आणि पुदीना पराठाची ऑर्डर केली होती. येथे पनीर मखनीची किंमत 2,900, तीन पराठे 1125, एक खस्ता रोटीसाठी 400 रुपये आकारण्यात आले आहेत. या अत्यंत सर्वसाधारण पदार्थांसाठी इतकी मोठी रक्कम आकारल्यामुळे सोशल मीडिया वापरकर्त्यांनी भुवया उंचावल्या आहेत. कोणत्याही हॉटेलमध्ये सहज उपलब्ध होईल अशा साधारण नॉर्थ इंडियन पदार्थ इतके जास्त महाग कसे काय असू शकतात? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
Restaurants, take note! pic.twitter.com/8jJEZxqGbg
— Ishan Sharma (@Ishansharma7390) December 13, 2024
या पोस्टवर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत. अशा तारांकित हॉटेलांनी खाद्यपदार्थांसाठी आकारण्यात येत असलेल्या अव्वाच्या सव्वा किमती नियंत्रणात आणणं आवश्यक आहे. यावर एकाने प्रतिक्रिया दिली आहे की, जितके पैसे तुम्ही पनीर मखनीसाठी आकारलेत तितक्या पैशात दरभंगा विद्यापीठात MA चं शिक्षण पूर्ण होतं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world