नेव्हीची नौका एलिफंटाकडे जाणाऱ्या प्रवासी बोटीला धडकली, 30 पैकी 21 जणांना वाचवण्यात यश

मुंबईतून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

जाहिरात
Read Time: 1 min
मुंबई:

मुंबईतून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबईतील गेट-वे ऑफ इंडियाहून एलिफंटाकडे जाणारी बोटीला धडक दिल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी बोटीमध्ये 30 प्रवासी असल्याची माहिती आहे. दरम्यान प्रवाशांच्या रेस्क्यूचं काम जलद गतीने सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गेट-वे ऑफ इंडियाच्या किनाऱ्यावरुन एलिफंटा लेणी पाहण्यासाठी नीलकमल नावाची बोट जात होती. 

नक्की वाचा - समुद्रात वेगाने फिरली अन् नेव्हीची स्पीड बोट थेट प्रवासी नौकेला धडकली, अपघाताचा थरारक Video समोर

नेव्हीच्या गस्ती नौकेने एलिफंटाकडे जाणाऱ्या बोटीला  धडक दिल्याची माहिती आहे. यावेळी प्रवासी बोटीत 30 प्रवासी होते. दरम्यान 30 पैकी 25 जणांना वाचवण्यात यश आलं आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, या प्रवासी बोटीला नेव्हीच्या गस्त घालणाऱ्या नौकेने धडक दिली होती. त्यातूनच प्रवासी बोट बुडाल्याची माहिती आहे. 25 प्रवाशांना वाचवण्यात यश आले आहे. अजून बरेच प्रवाशी बेपत्ता आहेत. बचाव कार्य सुरू आहे.