Pune Crime : मोठी बातमी! कुख्यात गुंड शाहरुख शेखचा सोलापुरात पुणे पोलिसांकडून एन्काऊंटर 

पुण्यातील कुख्यात टिपू पठाण गँगचा सक्रिय सदस्य आणि मोक्कातील फरार आरोपी शाहरुख उर्फ अट्टी रहीम शेख याचा एन्काऊंटर करण्यात आला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

पुण्यातील कुख्यात टिपू पठाण गँगचा सक्रिय सदस्य आणि मोक्कातील फरार आरोपी शाहरुख उर्फ अट्टी रहीम शेख (वय 23, रा. गल्ली नं. 23/ए, सय्यदनगर, हडपसर) याचा एन्काऊंटर रविवारी मध्यरात्री सोलापूर जिल्ह्यातील मोहोळजवळील लांबोटी गावात करण्यात आला आहे. ही कारवाई पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट 5 आणि 6 ने संयुक्तपणे केली. या घटनेने पुण्यातील गुन्हेगारी जगतात मोठी खळबळ उडाली आहे. मोहोळ तालुक्यातील लांबोटीजवळ पुण्यातील कुख्यात गुंड शाहरुख उर्फ अट्टी रहिम शेख याचा पोलिसांनी एन्काऊंटर केल्याची माहिती आहे.

पुणे पोलिसांना शाहरूख शेखबद्दल गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार पुणे पोलिसांनी सोलापुरमध्ये शाहरुखचा एन्काऊंटर केला आहे. मोहोळ जवळील लांबोटी येथे पहाटे साडे तीन वाजता हा एन्काऊंटर झाला. शाहरुख हट्टी हा फरार होता. त्याला पकडण्यासाठी गुन्हे शाखेचे पथक सोलापूर गेले होते. त्यावेळी शाहरुख हट्टीने पोलिसांवर हल्ला केला. पोलिसांनी केलेल्या उलट गोळीबारात शाहकुख मारला गेला.

Advertisement

(NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

शाहरुख काही दिवसांपासून लांबोटी गावात नातेवाइकांकडे लपून बसल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याच्यावर हडपसर, वानवडी आणि काळेपडळ पोलीस ठाण्यांत खूनाचा प्रयत्न, खंडणी आणि बेकायदेशीर शस्त्र बाळगण्याचे गंभीर गुन्हे दाखल होते. यावरून गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करत त्या परिसरात छापा टाकला.

Advertisement

गोळीबारात झाला एन्काऊंटर

छापा टाकताच शाहरुखने पोलिसांवर पिस्तुलातून गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनीही गोळीबार केला, त्यात शाहरुख गंभीर जखमी झाला. त्याला तात्काळ सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Advertisement

नक्की वाचा - BIG NEWS: भाजपचे माजी मंत्री संजय कुटे यांच्या घरात शेतकरी घुसला, घर जाळण्याचा ही प्रयत्न


रहिम शेख याच्या एन्काऊंटरनंतर नातेवाईकांचा आक्रोश


सोलापुरातील सिव्हिल रुग्णालयात पुण्यातील कुख्यात गुंड शाहरुख उर्फ रहिम शेख याचे वडील आणि पत्नीसह नातेवाईकांकडून आक्रोश व्यक्त केला जात आहे. शाहरुख शेख याचा एन्काऊंटर केल्यानंतर पुणे पोलिसांवर नातेवाईकांनी गंभीर आरोप केले आहेत. लांबोटी जवळील चंदननगर येथे चकमक करण्यासाठी गेलेल्या पथकाकडून गोळीबार करण्यात आल्याचा शाहरुख शेख याच्या पत्नीचा आरोप आहे. लांबोटी येथे शाहरुख शेख याला पकडण्यासाठी आलेल्या पुणे शहर पथकाकडून कोणतीही पूर्व सूचना न देता गोळीबार केल्याचा पत्नीचा आरोप आहे. वडील रहिम शेख यांनी पुणे शहर पोलिसातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी शाहरुख शेख यांच्याकडून पैसे घेतल्याचा दावा केला असून या पथकातील पोलीस अधिकाऱ्यांचं निलंबन करण्याची मागणी नातेवाईकांकडून केली जात आहे.