कांद्यानंतर सोयाबीन उत्पादकांसाठी सरकार पुढं सरसावलं, कृषी मंत्र्यांची मोठी घोषणा

सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी मोठी घोषणा केली.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

सोयाबीनसाठी यंदा सर्वाधिक खरेदी केंद्र सुरू करणार आहे, अशी घोषणा राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी केली आहे. 'NDTV मराठी' ला दिलेल्या Exclusive मुलाखतीमध्ये मुंडे यांनी ही घोषणा केली आहे. 'एमएसपी'पेक्षा कमी दर कोणी देणार नाही.  शेतकऱ्यांनी सोयाबीन सरकारच्या खरेदी केंद्रावरच द्यावेत, असं आवाहन मुंडे यांनी केलं आहे.

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

दर कमी झाले तर MSP मुळे शेतकऱ्यांना फायदा होईल. शेतमालाला चांगला भाव देणे हे शेतकरी विरोधी आहे का? असा प्रश्न मुंडे यांनी विचारला. धनंजय मुंडे यांनी यावेळी शरद पवार यांच्यावरही टीका केली. वीज माफी ते कापूस आणि सोयाबीनला दर देणारं सरकार हे शेतकरी विरोधी आहे? असं पवार यांना म्हणायचं आहे का? असा प्रश्न त्यांनी विचारला. सोयाबीन आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा मुद्दा आगामी विधानसभा निवडणुकीत सरकारसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या नाराजीचा मोठा फटका लोकसभा निवडणुकीत बसला होता. कांद्यावरील किमान निर्यात शुल्क (MEP) हटवण्याचा निर्णय केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वीच जाहीर केला. त्यापाठोपाठ आता सोयाबीन उत्पादकांसाठी कृषी मंत्र्यांनी ही मोठी घोषणा केली आहे.  

Advertisement

दरम्यान, 'मागील वर्षी आर्थिक नुकसान झालेल्या कापूस-सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 5 हजार प्रमाणे द्यावयाच्या मदतीची कार्यपद्धती आज मंत्रालयात संबंधित अधिकाऱ्यांच्या समवेत बैठक घेऊन अंतिम करण्यात आली. याद्वारे सुमारे 91 लाख हेक्टरवरील 83 लाख शेतकऱ्यांना 4192 कोटी अनुदान वितरित केले जाईल. 

Advertisement

( नक्की वाचा : तिरुपती बालाजीच्या प्रसादात प्राण्यांची चरबी ! प्रयोगशाळेतील रिपोर्टमधून सत्य उघड )
 

या अनुदानाचे वितरण देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदींच्या हस्ते करण्याचे नियोजन केले जात आहे. तत्पूर्वी याबाबतच्या सर्व तांत्रिक बाबी पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. 

Advertisement

यावर्षी सोयाबीनचे बंपर उत्पन्न अपेक्षित असून शासनाकडून नाफेड व एनसीसीएफ मार्फत सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्रे सुरू करण्याची प्रक्रिया जलद गतीने पूर्ण करावी, असेही निर्देश आजच्या बैठकीत संबंधीतांना दिले आहेत', असं धनंजय मुंडे यांनी जाहीर केलं आहे. मुंडे यांनी फेसबुकवर लिहिलेल्या पोस्टमध्ये ही माहिती दिली आहे. 
 

Topics mentioned in this article