राज्यात GBS नंतर Bird Flu एन्ट्री ! नांदेडमध्ये 465 पक्षी नष्ट, प्रशासनाकडून महत्त्वाच्या सूचना

Bird Flu : नांदेड जिल्ह्यातल्या एका गावामध्ये काही पक्षांमध्ये बर्डफ्लू सदृश्य लक्षणे आढळून आली आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins
प्रतिकात्मक फोटो
नांदेड:

गुईलेन बॅरे सिंड्रोम  (Guillain-Barre Syndrome) अर्थात ‘जीबीएस' या आजारानं सध्या राज्यातील आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आहे. विशेषत: पुण्यात या आजारामुळे भीतीचं वातावरण आहे. त्याचवेळी नांदेड जिल्ह्यातल्या एका गावामध्ये काही पक्षांमध्ये बर्डफ्लू सदृश्य लक्षणे आढळून आली आहेत.

लोहा तालुक्यातील केवळ किवळा या गावामध्ये 20 तारखेच्या आसपास एका पशुपालकाच्या कुक्कुट पक्षांमध्ये मृत पक्षी आढळून आल्याने त्याचे नमुने राज्य व राष्ट्रीयस्तरीय प्रयोग शाळेत निदानासाठी पाठविले होते. या प्रयोगशाळेतील बर्डफ्लूसाठीचे नमुने पॉझिटिव्ह दिसून आल्यानंतर या गावामधील 1 किमी परिघाच्या क्षेत्रातील सर्व कुक्कुट पक्षी शास्त्रोक्त पद्धतीने नष्ट केले आहेत. त्यामध्ये साधारणपणे 382 मोठे पक्षी आणि 74 छोटे पक्षी असे एकूण 456 पक्षी नष्ट केले आहेत.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

त्याचबरोबर संसर्ग झालेल्या 1 किमी क्षेत्राबाहेरील बाधित क्षेत्राच्या 10 किमीपर्यंत सर्तकता क्षेत्र घोषित केले आहे. त्या क्षेत्रातील जितके कुक्कुट पक्षी आहेत त्याचे नमुने दर 15 दिवसाला पुढील 3 महिन्यांपर्यंत प्रयोगशाळेकडे पाठवून त्याचे निदान केले जाणार आहे. त्या पक्षांमध्ये जर आपल्याला परत लक्षणे आढळून आली तर त्यावरही प्रतिबंधात्मक उपाययोजना केली जाणार आहे.

अफवांना बळी पडू नका

दरम्यान,  नांदेड जिल्ह्यात बर्डफ्लू आजारासंदर्भात नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये. उकडलेली अंडी व शिजवलेले चिकन खाणे मानवी आरोग्यास पूर्णपणे सुरक्षित आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये बर्ड फ्लूची लागण झालेली नाही. त्यामुळे यासंदर्भात समाजमाध्यमांवर फिरणारे संदेश व काही माध्यमातून आलेल्या चुकीच्या बातम्यांना बळी पडू नका. चिकन, अंडी खाणे शंभर टक्के सुरक्षित असल्याचा खुलासा पशुसंवर्धन विभागाने केला आहे.

Advertisement

( नक्की वाचा : Guillain-Barre syndrome : 'सकाळी उठल्यावर लक्षात आलं...' GBS ची लागण झालेल्या रुग्णानं सांगितला अनुभव )
 

पुण्यात जीबीएस रुग्ण शंभरीपार

पुणे जिल्ह्यात गुईलेन बॅरे सिंड्रोमची (Pune रुग्णसंख्या शंभरीपार गेली आहे. आतापर्यंत पुण्यात याचे 101 रुग्ण आढळून आले आहेत. यातील 16 रुग्ण व्हेंटिलेटरवर (Pune GBS) आहेत. आजारामागची कारणे शोधण्यासह पाणीपुरवठा स्रोतांची, पाणीपुरवठा करणाऱ्या खासगी व शासकीय टँकरमधील पाण्याची तपासणी, घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणे, लक्षणे आढळलेल्या व्यक्तींना तात्काळ रुग्णालयात दाखल होण्यासाठी आवाहन तसेच जनजागृती करणे आदी सर्वंकष उपाययोजना कराव्यात असे निर्देश सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबीटकर यांनी दिले आहेत. 

Topics mentioned in this article