BJP Vidhan Parishad Candidate : भाजपकडून विधान परिषदेवर कोणाला संधी? अखेर अधिकृत यादी जाहीर

भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीने महाराष्ट्रात होणाऱ्या विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी तीन उमेदवारांची घोषणा केली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

BJP Vidhan Parishad Candidate List  : भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीने महाराष्ट्रात होणाऱ्या विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारांची घोषणा केली आहे. विधान परिषदेच्या उमेदवारांबाबत चर्चा झाल्यानंतर अखेर आज भाजपची यादी जाहीर करण्यात आली आहे. राजकीय गोटातून अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. विधान परिषदेमध्ये भाजपच्या वाट्याला तीन जागा निश्चित आहेत. उद्या अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस आहे आणि आता ही नाव जाहीर झालेली आहेत. या यादीत संदीप जोशी, संजय केनेकर आणि दादाराव केचे यांच्या नावाचा समावेश आहे. यंदा विधान परिषदेतील पाच जागा रिक्त झाल्या आहेत. त्यात भाजपला तीन जागा मिळण्याचं निश्चित आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

दादाराव किचे यांच्या आर्वी विधानसभा येथून सुमीत वानखेडे हे आमदार झाले आहेत. त्यामुळे किचे यांना विधान परिषदेत संधी दिल्याचं सांगितलं जात आहे. त्याशिवाय संदीप जोशी हे देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरात लोकल स्तरावर महत्त्वाचं काम पाहतात. जोशी हे फडणवीस यांचे निकटवर्तीय असल्यामुळे त्यांना संधी मिळाल्याची माहिती आहे. 

Advertisement

नक्की वाचा - Jayant Patil: शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं मिशन 'ओबीसी', जयंत पाटीलांनी पत्ते खोलले

संदीप जोशी हे देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री असतांना उपमुख्यमंत्री कार्यालयाचे मानद सचिव बनविण्यात आले होते. 2019 मध्ये संदीप जोशी यांना भाजपने विधान परिषदेची उमेदवारी दिली होती. पण त्यात ते पराभूत झाले होते. संदीप जोशी नागपूरचे महापौर असताना महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे होते. यावेळी संदीप जोशी आणि तुकाराम मुंडे वाद चांगलाच रंगला होता. 2019 मध्ये संदीप जोशी भाजपचा बालेकिल्ला असलेल्या नागपूर पदवीधर मतदार संघात पराभूत झाले होते. या जागेवर भाजपने जवळपास 27 वर्षे विजय मिळवला होता.

Advertisement