मुंबई: मुंबई भाजपचा अध्यक्ष अद्याप अंतिम होत नाही यामुळे पक्ष संघटनेतील इच्छुकांमध्ये अस्वस्थता वाढल्याचे दिसत आहे. मुंबई भाजपचे विद्यमान अध्यक्ष अशिष शेलार यांच्याकडे कॅबिनेट मंत्रीपद आले आहे त्याचवेळी मुंबईची अध्यक्षपदाची जबाबदारी देखील आहे. आगामी काळात मुंबई महापालिका निवडणुका आहेत अशा परिस्थितीमध्ये पूर्णवेळ मुंबई भाजपा अध्यक्ष एका व्यक्तीकडे असावं असा मतप्रवाह आहे. यामुळे मुंबई भाजपा अध्यक्षपदासाठी प्रवीण दरेकर, अमित साटम यांची नावं सर्वाधिक चर्चेला आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
माजी आमदार सुनील राणे हे देखील इच्छुक असून भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी मात्र राणे यांच्या नावाला फुले मारल्याची जोरदार चर्चा आहे. यामुळे दरेकर आणि साटम यांच्यात अधिक स्पर्धा आहे. दरेकर आणि साटम दोघेही गेले अनेक दिवस मुंबई अध्यक्ष पदाची माळ आपल्या गळ्यात पडावी यासाठी टॉपिंग करत आहेत. पण अद्यापही अधिकृत घोषणा झालेली नाही. दुसरीकडे महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे देखील महसूल मंत्रिपद आहे यामुळे बावनकुळे यांच्याऐवजी रवींद्र चव्हाण यांच्याकडे प्रदेशअध्यक्ष पदाची जबाबदारी दिलेली असल्याचं सूचक वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाची ज्येष्ठ नेते अमित शहा यांनी नांदेड दौऱ्यात बोलून दाखवले होते.
यामुळे रवींद्र जवानांचा मार्ग मोकळा झाला आहे मात्र दुसरीकडे मुंबई भाजपा अध्यक्षपदाची निवड अद्यापही कोणाची वाटणी लागेल याविषयी स्पष्ट चित्र नाही. मुंबईमधील सहाही जिल्हाध्यक्षांची निवड काही दिवसांपूर्वी झाली आहे, मात्र मुंबई भाजप अध्यक्ष कोण होणार याची जोरदार चर्चा आहे. दरेकर आणि साटम हे दोघेही चूक असले तरी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोणाच्या बाजूने कौल देतायेत याकडे महत्त्वाचं लक्ष आहे.
( नक्की वाचा : 'कुछ कुछ होता है'मधील अंजलीचा फोटो व्हायरल, 27 वर्षानंतरचा लुक पाहून बसणार नाही विश्वास )
दरम्यान, प्रविण दरेकर यांनी कॅबिनेटमध्ये वर्णी लागावी यासाठी खूप प्रयत्न होते पण दरेकरांची वर्णी लागली नाही. यामुळे किमान आता तरी मुंबई अध्यक्षपदाची वर्णी लागेल अशी जोरदार चर्चा आहे पण अंतिम नाव स्पष्ट होत नसल्यामुळे भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे.