भाजपचं ठरलं? विधान परिषदेसाठी 'या' नेत्यांना मिळणार संधी

प्रदेश भाजपने विधान परिषदेसाठी 10 नावांची शिफारस केली आहे. त्यात लोकसभेत पराभूत झालेल्या काही नेत्यांची नावे ही आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

विधान परिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक होणार आहे. महायुतीत यातील जवळपास 6 जागा भाजपच्या वाट्याला येतील. यासाठी कोणाला संधी द्यावी याची शिफारस भाजपकडून केंद्रीय नेतृत्वाला करण्यात आली आहे. जवळपास 10 नावांची शिफारस करण्यात आली असून त्यातील किती जणांना संधी मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे यात काही नेत्यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला आहे. त्यांना विधान परिषदेवर घेवून त्यांचे पुनर्वसन करण्याचा नियोजन प्रदेश भाजपचे दिसते. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

पराभूत नेत्यांना संधी? 

प्रदेश भाजपने विधान परिषदेसाठी 10 नावांची शिफारस केली आहे. त्यात लोकसभेत पराभूत झालेल्या काही नेत्यांची नावे ही आहेत. त्यात पंकजा मुंडे, रावसाहेब दानवे आणि महादेव जानकर यांच्या नावाचा समावेश आहे. पंकजा मुंडे या बीड लोकसभा मतदार संघातून निसटत्या फरकाने पराभूत झाल्या. तर रावसाहेब दानवे यांना मोठ्या फरकाने पराभवाचा सामना करावा लागला. ते जालना लोकसभा मतदार संघातून हरले. तर महादेव जानकर यांना परभणी लोकसभा मतदार संघातून पराभवाचा सामना कराला लागला. हे तीनही नेते विधानसभा निवडणुकीसाठी महत्वाचे आहेत. त्यामुळे त्यांना संधी देण्याची शिफारस प्रदेश भाजपने केले आहे. त्यांचे पुनर्वसन केल्यास आगामी विधानसभा निवडणुकीत त्याचा फायदा होईल असे पक्षाला वाटते.      

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - राष्ट्रवादीत काय चाललंय? अजित पवारांच्या आमदारांची बंद दाराआड जयंत पाटलांशी चर्चा

कोणाला मिळणार संधी? 

या तीन नावां बरोबरच आणखी सात नावांची शिफारस केली गेली आहेत. त्यात अमित गोरखे,परिणय फुके, सुधाकर कोहळे, योगेश टिळेकर, निलय नाईक, हर्षवर्धन पाटील, चित्रा वाघ आणि  माधवीताई नाईक यांचा समावेश आहे. या नावांमध्येही महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, परिणय फुके यांची नावे ठळक पणे दिसून येतात. हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर विधानसभेतून निवडणूक लढायचे आहे. मात्र जागा वाटपात ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला जाण्याची शक्यता आहे.त्यामुळे त्यांची वर्णी विधान परिषदेवर लावली जावू शकते. तर चित्र वाघ हा पक्षातला आक्रमक महिला चेहरा म्हणून ओळखला जातो. त्यामुळेही त्यांचा विचार केला जावू शकतो. 
 

Advertisement