जाहिरात

राष्ट्रवादीत काय चाललंय? अजित पवारांच्या आमदारांची बंद दाराआड जयंत पाटलांशी चर्चा

शुक्रवारी अजित पवार (Ajit Pawar) विधिमंडळ अधिवेशनात अर्थसंकल्प मांडणार आहेत. त्यापूर्वीचं अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये टेन्शन वाढलंय. 

राष्ट्रवादीत काय चाललंय? अजित पवारांच्या आमदारांची बंद दाराआड जयंत पाटलांशी चर्चा
मुंबई:

लोकसभा निवडणुकीच्या निकालातून सावरण्यापूर्वीच आता विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. या निवडणुकांपूर्वी विधिमंडळाचं शेवटचं अधिवेशन गुरुवारपासून (27 जून) सुरु झालं आहे. आता शुक्रवारी अजित पवार (Ajit Pawar) या अधिवेशनात अर्थसंकल्प मांडणार आहेत. त्यापूर्वीचं अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये टेन्शन वाढलंय. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी   शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची अजितदादा गटाच्या पाच ते सहा आमदारांनी भेट घेतली. विधानभवनातल्या एका खोलीमध्ये ही भेट झाली. पश्चिम महाराष्ट्रातल्या चार ते पाच आमदारांनी भेट घेतल्याची माहिती, सूत्रांनी दिली आहे. अजितदादा गटाचे आमदार शरद पवार गटाच्या संपर्कात आहेत का? या चर्चांना या भेटीच्या वृत्तानंतर उधाण आलं आहे.  

अजित पवारांच्या प्रवक्त्यांना नोटीस

दरम्यान , अजित पवार पक्षाच्या सर्व प्रवक्त्यांना प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी नोटीस बजावल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. हायुतीबाबत राजकीय भाष्य  बोलताना पक्षनेतृत्वाशी मान्यता घेऊन बोलण्याची ताकीद देण्यात आली आहे.  जागावाटपाच्या आकड्यावरुन वाद झाल्यानं प्रवक्त्यांना सूचना देण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्याकडून वेगवेगळी वक्तव्य करण्यात येत होती. महायुतीच्या जागा वाटपाची चर्चा सुरु असतानाच ही वक्तव्य आल्यानं समन्वयाचा अभाव असल्याचं स्पष्ट झालं होतं. त्यानंतर डॅमेज कंट्रोल म्हणून पक्षानं ही कारवाई केली आहे, असं मानलं जातंय.

Exclusive : एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होतील असं नाही, भाजपाच्या बड्या नेत्यानं सांगितला प्लॅन

लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठा पराभव झाला. त्यांना फक्त 1 जागा मिळाली. संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या बारामतीमधील निवडणुकीतही सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला. या कामगिरीचे पडसाद पक्षामध्ये उमटले आहेत. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com