
Navneet Rana Dance Video : भाजप नेत्या आणि अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा या सध्या वेगळ्याच कारणाने चर्चेत आहेत. राणा यांचा एका गाण्यावरील डान्स व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. 'किसी के हात ना आयेगी ये लडकी...' या लोकप्रिय हिंदी गाण्यावर नवनीत राणा यांनी ठेका धरला असून, त्यांच्या डान्समधील उत्साह लक्षवेधी ठरला आहे.
व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये नवनीत राणा हातात छत्री घेऊन डान्स करताना दिसत आहेत. त्यांच्या या हटके अंदाजाने नेटकऱ्यांना आकर्षित केले आहे. नेहमी राजकीय व्यासपीठांवर गंभीर आणि आक्रमक भूमिकेत दिसणाऱ्या नवनीत राणा यांना अशा वेगळ्या आणि उत्साही अंदाजात पाहून अनेक जण आश्चर्य व्यक्त करत आहेत.
VIDEO
सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ कोणत्या ठिकाणचा आहे याबाबतची नेमकी माहिती उपलब्ध नाही. मात्र, नवनीत राणा यांच्या या डान्स व्हिडिओमुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. हा व्हिडिओ अल्पावधीतच हजारो लोकांनी पाहिला असून, त्यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world