संकटमोचक धावले, सव्वातास शिंदेंसोबत बंद दाराआड चर्चा; भेटीत काय ठरलं?

गिरीश महाजन आणि एकनाथ शिंदे यांची बैठक संपली असून गिरीश महाजन यांनी भेटीबाबत पत्रकारांशी बातचीत केली.

जाहिरात
Read Time: 1 min
मुंबई:

गिरीश महाजन आणि एकनाथ शिंदे यांची बैठक संपली असून गिरीश महाजन यांनी भेटीबाबत पत्रकारांशी बातचीत केली. एकनाथ शिंदे यांची प्रकृती बरी नव्हती. तब्येतीची विचारपूस करण्यासाठी त्यांच्या भेटीसाठी आल्याचं गिरीश महाजन यांनी सांगितलं. महायुतीत सर्व आलबेल असून आमच्यात मतमतांतर नसल्याचं गिरीश महाजन यावेळी म्हणाले. 5 डिसेंबर रोजी शपथविधीचा दिमाखदार कार्यक्रम होणार आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अमित शाह आणि देशभरातील मोठे नेते उपस्थित राहणार असल्याचं महाजन म्हणाले. 

नक्की वाचा - सत्ता स्थापनेच्यापूर्वी शिवसेना खासदार रिंगणात, एकनाथ शिंदेंकडं केली आग्रही मागणी

23 नोव्हेंबर रोजी महायुतीला लँडस्लाइ़ड बहुमत मिळालं. त्यानंतर तब्बल नऊ दिवस झाले तरीही अद्याप  एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपदासह गृहखातं मिळावं यासाठी ठाम आहेत. मात्र भाजप गृहखातं सोडण्यास तयार नसल्याची माहिती आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा आहे. एकनाथ शिंदे यांनी मनधरणी करण्यासाठी आज भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन त्यांच्या भेटीसाठी आले होते. दोघांमध्ये तब्बल सव्वातास चर्चा झाली.