सुजय विखेंचा पत्ता कट, जयश्री थोरातांविरोधात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याची सभा भोवली?

अहमदनगरमधील संगमनेरमधून अमोल खताळ यांना शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

जाहिरात
Read Time: 1 min
संगमनेर:

भाजपची तिसरी यादी समोर आल्यानंतर अनेकांना मोठा धक्का बसला आहे. यामध्ये सुजय विखे पाटलांचं नाव नव्हतं. तर विशेष म्हणजे अहमदनगरमधील संगमनेरमधून अमोल खताळ यांना शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. यामुळे मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांना मोठा झटका बसला आहे. संगमनेर मतदारसंघातून सुजय विखे पाटलांना तिकीट मिळणार असल्याची चर्चा सुरू होती. मात्र ऐनवेळी त्यांना ठेंगा दाखवण्यात आल्याने चर्चेला उधाण आलं आहे. 

जयश्री थोरातांविरोधातील वादग्रस्त व्यक्तव्याची सभा भोवली? 
आमदारकीसाठी उत्सुक असलेल्या सुजय विखे पाटील यांनी काही दिवसांपूर्वी संगमनेरमध्ये संकल्प मेळाव्याचं आयोजन केलं होतं. यावेळी जयश्री थोरातांना उत्तर देताना भाजपचे कार्यकर्ते वसंत देशमुख यांनी बाळासाहेब थोरात आणि त्यांच्या कुटुंबावर टीका केली होती. यावेळी त्यांनी जयश्री थोरात यांना लक्ष्य करीत आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. यानंतर सभेत मोठा गोंधळ पाहायला मिळाला. या विधानावर काँग्रेस महिलांना संताप व्यक्त केला. अनेक ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या. सभास्थळी काहींनी गाड्यांच्या काचा फोडल्या तसेच काही गाड्यांना आगही लावली.