Pankaja Munde Dussehra Melava Speech : "मी भगवानबाबांच्या चरणी प्रार्थना करते, एवढ्या नदीमध्ये पूर आला असताना, गावागावात पाणी शिरलं असताना, लोकांचे घरं आणि संसार वाहून गेले असताना देखील तुम्ही एवढ्या उन्हात एवढ्या लांब आलात.ही परंपरा सोन्यासारख्या माणसांसाठी आहे. सोनं लुटण्यासाठी आहे. इथला एक एक माणूस सोन्याचं खणकणारं नाणं आहे. जे सज्जनासारखे गरिबासारखे बसलात आणि जे माझे शब्द ऐकण्यासाठी बसलात, ते आहेत गोपिनाथ मुंडे आणि पंकजा मुंडे यांचे बहाद्दर सैनिक..", असं मोठं विधान भाजप नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांनी भगवानगडावर आयोजित दसरा मेळाव्यात केलं. ज्या लोकांचे संसार वाहून गेले. त्या गावात मी गेले, त्यांचे दु:ख बघितल आणि माझ्या डोळ्यात अक्षरक्ष: अश्रू आले. घरात सुखाचा घास सुद्धा माझ्या तोंडात गेला नाही, असं म्हणत पंकजा मुंडे यांनी शेतकऱ्यांना दिलासा दिला.
भगवानगडावर दसरा मेळाव्यात पंकजा मुंडे नेमक्या काय म्हणाल्या?
"माझ्यासाठी, माझ्या भगवान दादांसाठी आणि गोपिनाथ मुंडे साहेबांचा वारसा जगण्यासाठी आलेल्या प्रत्येक माणसाचं मी हृदयातून स्वागत करते. भगवानदादांनी सुरू केलेलं सीमोल्लंघन आज पुराच्या, अतिवृष्टीच्या अत्यंत अडचणीच्या काळातही तुम्ही यशस्वी करून दाखवलं. मी तुमचं मनापासून अभिनंदन करते. सीमोल्लंघन हा मेळावा नाही, आपला दसरा हा केवळ एक मेळावा नाही..तर डोंगर कपाऱ्यांमध्ये कष्ट करणाऱ्या,उस तोडणाऱ्या अत्यंत संघर्षाने उभं राहिलेल्या या साध्या माणसांचा हा कार्यक्रम आहे", असंही पंकजा मुंडे म्हणाल्या.
नक्की वाचा >> Car Accident Video: हायवेवर 'ती' एकच चूक नडली, अस्थि विसर्जनासाठी निघालेल्या एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू!
पंकजा मुंडे कार्यकर्त्यांना संबोधीत करताना म्हणाल्या, हे धिंगाणा घालायला आले आहेत, असं मला काही वाटत नाही.माझ्या घोषणा देऊन तुमच्या विषयीचं माझं मत बदलणार नाही. ज्या लोकांचे संसार वाहून गेले. त्या गावात मी गेले, त्यांचे दु:ख बघितल आणि माझ्या डोळ्यात अक्षरक्ष: अश्रू आले. घरात सुखाचा घास सुद्धा माझ्या तोंडात गेला नाही. असा समाज आणि अशी साखळी घडवण्याची आवश्यकता आहे, असा नेता आपल्या सगळ्यांना आवश्यक आहे.माझ्या या लोकांचं दु:ख बघून मला ज्या वेदना झाल्या,त्या शब्दात मांडू शकणार नाही.
"पण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वतीने मी शब्द देते की, या शेतकऱ्याला मदत करण्यासाठी सरकार पूर्णपणे त्यांच्या पाठीशी उभी राहील. माझ्या घोषणा देण्यानं तुम्ही पवित्र होणार नाहीत. तुम्ही कशासाठी आला आहात,ते मला कळलंय.जो माझा दसरा भगवान गडाचा होता.तो सुद्धा माझ्याकडून हिरावून घेतला. आता तुम्हीपण हा हिरावून घेण्यासाठी आला आहात,असं वाटायला लागलंय.इतके वर्ष मी इथे भाषण केलं.पण असं बेशिस्तपणे कोणी वागलं नाही.तुम्ही तुमच्या शुद्धीवर नाहीत. असे माणसं मी सांभाळतच नाही.शेतकऱ्यांना मी वचन देते, सर्वजण काही चिंता करू नका", असंही आश्वासन पंकजा मुंडे यांनी दसरा मेळाव्यात दिलं.
हे ही वाचा >> सोनं चोरट्यांच्या सुळसुळाट,'त्या' ज्वेलर्समध्ये महिलेनं साडीत लपवला सोन्याचा हार..CCTV फुटेज आलं समोर