
Woman Gold Robbery Viral Video : सोन्या-चांदीसारखे दागिने खरेदी करणं अनेक महिलांना आवडतं. कारण सण असो किंवा मोठा समारंभ महिला सोन्याचे दागिने परिधान करून त्यांच्या सौंदर्यात भर टाकत असतात. पण काही महिला अशाही असतात, ज्या सोनं चोरी करण्याचा गंभीर गुन्हा करतात.गावागावत किंवा शहरात राहणाऱ्या लोकांच्या फ्लॅटमध्ये चोरटे दरोडा टाकण्याचा प्रयत्न करतात. सोनं चोरीच्या अनेक घटनांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अशातच एका महिला चोरट्याचाही धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.
महिलेनं काही सेकंदातच चोरला सोन्याचा हार, पाहा व्हिडीओ
एक महिला एका व्यक्तीसोबत सोनं खरेदी करण्यासाठी पेढीवर गेली होती. त्यावेळी पेढीवर असलेल्या कर्मचाऱ्यांनी त्या ग्राहकांना सोन्याचे दागिने दाखवले. पण महिलेनं काही सेकंदातच पेढीवर सर्वांसमोर सोन्याचा हार लंपास केला. महिला चोरट्याचा हा व्हिडीओ सीसीटीव्हीत कैद झाला असून इंटरनेटवर तुफान व्हायरल झाला आहे. सोनं चोरीची ही घटना उत्तरप्रदेशच्या बुलंदशहरमध्ये घडली. सोन्याचा हार चोरणाऱ्या या महिलेनं चालाखीने सोन्याचा हार साडीत लपवला अन् चोरीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला.
इथे पाहा चोरट्या महिलेचा व्हायरल व्हिडीओ
बुलंदशहर पंडित ज्वेलर्स के शो रूम से ऐसे चोरी हुआ लाखों का सोने का हार pic.twitter.com/nY16caNWUs
— Shah Nawaz journalist (News 24) (@Shahnawazreport) September 30, 2025
नक्की वाचा >> गरबा खेळली अन् मध्यरात्री घरी निघाली, रस्त्यात एकटीला पाहून Rapido ड्रायव्हरने जे केलं..तरुणीनं थेट VIDEO बनवला अन् नंतर..
या व्हिडीओत पाहू शकता की, एक महिला ग्राहक बनून सोन्याच्या पेढीवर जाते आणि सोनं विक्री करणाऱ्यांसमोरच ती महिला दागिने लंपास करते. दुकानदार महिलेला सोन्याचे आकर्षक दागिने दाखवतो. त्यानंतर महिला गुपचूप एक सोन्याचा हार साडीमध्ये लपवते. महिला आणि तिच्यासोबत असलेला व्यक्ती सोफ्यावर बसलेले असतात. त्यामुळे दुकानदाराला महिलेनं सोन्याचा हार साडीमध्ये गुंडाळल्याचं दिसत नाही. पण जेव्हा दुकानदार शॉप बंद करतो, त्यावेळी दुकानात सोन्याचा एक हार कमी असल्याचं त्याच्या निदर्शनास येतं. त्यानंतर दुकानदार सीसीटीव्ही चेक करतो आणि या संपूर्ण घटनेचा पर्दाफाश होतो.
नक्की वाचा >> Viral Video: 'लाज वाटत नाही का तुम्हाला..', CRPF अधिकाऱ्याने गुपचूप काढले महिलेच्या पायाचे फोटो, विमानतळावर झाला राडा अन्..
इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार, दुकानाचा मालक गौरव पंडितने याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्याने तक्रारीत म्हटलंय की, चोरी झालेल्या सोन्याच्या दागिन्याची किंमत जवळपास 6 लाख रुपये आहे. चोरट्यांचा सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतरही चोरांना अद्यापही पडकण्यात आलेलं नाहीय. पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरु आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world