Nishikant Dubey: "आमच्या पैशांवर तुम्ही जगताय', हिंदी वादावरुन भाजप खासदार बरळले, थेट ठाकरेंना आव्हान!

Nishikany Dubey On Hindi Controversy: निशिकांत दुबे यांनी एक्स माध्यमावर पोस्ट करत मराठीसाठी लढणाऱ्या नेत्यांना जाहीर आव्हान दिलं आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

Nishikant Dubey On Hindi Controversy: महाराष्ट्रात सध्या हिंदी- मराठीवादाचा मुद्दा चांगलाच चर्चेत आहे. मराठीचा अपमान करणाऱ्यांना मनसे स्टाईल दणका दिला जात आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही महाराष्ट्रात मराठीचा अपमान सहन केला जाणार नाही, असा थेट इशारा दिला आहे. ठाकरेंच्या या इशाऱ्यानंतर भाजप खासदार निशिकांत दुबेंनी वादग्रस्त विधान करत थेट चॅलेंज दिले आहे.

Raj Thackeray Uddhav Thackeray Reunion: 1 मेळावा, 2 ठाकरे आणि 5 प्रश्न! कधी मिळणार महाराष्ट्राला उत्तर?

निशिकांत दुबेंचे वादग्रस्त ट्वीट!

याबाबत सविस्तर माहिती अशी की,  भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी महाराष्ट्रात सुरू असलेल्या हिंदी मराठी वादात उडी घेत संतापनजक विधान केले आहे, ज्यावरुन नवा वाद उभा राहण्याची शक्यता आहे. निशिकांत दुबे यांनी एक्स माध्यमावर पोस्ट करत मराठीसाठी लढणाऱ्या नेत्यांना जाहीर आव्हान दिलं आहे. 

Advertisement

"जर मुंबईत हिंदी भाषिकांना मारणाऱ्यांमध्ये हिंमत असेल तर महाराष्ट्रात उर्दू भाषिकांना मारून दाखवा. आपल्या गल्लीत कुत्राही वाघ होतो. कोण कुत्रा कोण वाघ हे तुम्हीच ठरवा, असं संतापजनक ट्वीट निशिकांत दुबे यांनी केले आहे. निशिकांत दुबेंच्या या विधानामुळे हिंदी- मराठीचा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे. 

मराठीवरुन गरळ ओकली!

याबाबत माध्यमांशी बोलतानाही निशिकांत दुबे यांनी मराठी- हिंदी वादावरुन गरळ ओकली आहे. "तुम्ही कोणाची रोटी खाताय? तिथे टाटा, बिर्ला आहेत रिलायन्स कोणाची महाराष्ट्रात युनिट नाहीयेत. टाटांची पहिली फॅक्टरी बिहार-झारखंडमध्ये लागली. आमच्या पैशांवर तुम्ही जगताय. तुम्ही कोणता टॅक्स आणताय ? कोणते उद्योग आहेत तुमच्याकडे ? खाणी आमच्याकडे आहेत; झारखंड, छत्तीसगगड, मध्य प्रदेश, ओडिशाकडे आहे. रिलायन्स, एसारने रिफायनरी ही गुजरातमध्ये लावली आहे. सगळे उद्योग गुजरातमध्ये येत आहे," असे म्हणत दुबेंनी अकलेचे तारे तोडलेत.

Advertisement

तसंच "तुमच्यात हिंम्मत आहे तर उर्दू भाषिकांनाही मारा, तेलुगू, तमिळ लोकांनाही मारा. मी नेहमी म्हटलं की आपल्या घरात तुम्ही नेहमी मोठे बॉस असता. या एकदा बिहार, उत्तर प्रदेशला, तमिळनाडू. आपटून आपटून मारू. आम्ही मराठीचा सन्मान करतो, मराठी आदरणीय भाषा आहे. महाराष्ट्राचे भारताच्या स्वातंत्र्यामध्ये मोठे योगदान आहे. महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे जे व्होटबँक पॉलिटीक्स करत आहेत यापेक्षा वाईट गोष्ट कोणती नसेल. त्यांच्यात हिम्मत असेल तर शेजारच्या माहीम भागात जाऊन दर्ग्याशेजारी हिंदी, उर्दू भाषिकांना चोपून दाखवावं, तर मी मानेन की ते बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारस आहेत आणि ते त्यांनी आखून दिलेल्या मार्गांवर चालत आहेत, असंही दुबेंनी म्हटलं आहे. 

Advertisement

Raj Thackeray Uddhav Thackeray: "म मराठीचा नाहीच… सत्तेचाच", भाजपचा राज-उद्धव यांच्यावर निशाणा