BMC Election 2026: 'सगळी पदे वरळीमध्येच का?' किशोरी पेडणेकर यांच्या नियुक्तीवरुन ठाकरे गटात नाराजीनाट्य

मुंबई महानगरपालिका ठाकरे गटाच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. या निवडीनंतर शिवसेना ठाकरे गटामध्ये नाराजीचा सूर पसरल्याची मोठी बातमी समोर आली आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

Mumbai Municiple Corporation Election 2026: महापालिका निवडणुकानंतर राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. शिवसेना ठाकरे गटाच्या नगरसेविका आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची मुंबई महानगरपालिका ठाकरे गटाच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. या निवडीनंतर शिवसेना ठाकरे गटामध्ये नाराजीचा सूर पसरल्याची मोठी बातमी समोर आली आहे. 

किशोरी पेडणेकरांच्या निवडीवरुन नाराजी...

याबाबत सविस्तर माहिती अशी की,  माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना गटनेते पद बहाल केले असले तरी त्याविरोधात पक्षात तीव्र नाराजी व्यक्त होऊ लागली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेतील ज्येष्ठ मंडळी निवडून आलेली असताना त्यांना डावलून कोरोनापूर्व त्यानंतरच्या काळात आरोप झालेल्या व्यक्तीला गटनेते पद दिल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

Raj Thackeray : 'शिसारी आलीय...'; कल्याण-डोंबिवलीतील प्रकारावर राज ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया

यावेळीही त्यांच्याबद्दल प्रभागात नाराजीचा सूर उमटत असताना देखील तिकीट वाटपाच्या वेळी पक्षाने त्यांना अखेरच्या क्षणी उमेदवारी दिली. महानगर पालिकेच्या निवडणुकीत विजयी झाल्यानंतर त्यांना गटनेते पदी नियुक्ती करण्यात आली. निवडणुकीत मिलिंद वैद्य, यशोधर फणसे, विठ्ठल लोकले, विशाखा राऊत, श्रद्धा जाधव आदी मातबर मंडळी निवडून आली आहे, या सर्वांना डावलून पेडणेकर यांना संधी दिल्याने नाराजीचा सुर आहे.

सगळी पदे वरळीमध्येच का? 

सोबतच वरळी विधानसभा मतदारसंघात विधान परिषदेतील दोन आमदार, माजी महापौर, माजी उपमहापौर, बेस्ट समिती अध्यक्षपद भूषविलेले ज्येष्ठ माजी नगरसेवक अशी पदाधिकाऱ्यांची मोठी फौज आहे. त्यामुळे सर्व पद वरळी विधानसभेत का? असा देखील प्रश्न उपस्थित केला जात आहे. आता या नाराजीकडे पक्षश्रेष्ठी कसे पाहतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Advertisement

( नक्की वाचा : Raj Thackeray : 'माझ्यासाठी पक्ष सोडणं नव्हतं.. ' थेट उद्धव ठाकरेंसमोर राज ठाकरेंनी मांडली वेदना, पाहा VIDEO )