BMC Election 2026: मुंबईत 453 उमेदवारांची माघार! 'इतके' जण निवडणुकीच्या रिंगणात, कोणत्या विभागात किती उमेदवार?

आज शनिवार, दिनांक ३ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजेपासून निवडणूक चिन्‍ह नेमून दिली जाणार आहेत. तसेच निवडणूक लढविणा-या उमेदवारांची अंतिम प्रसिद्ध केली जाणार आहे. 

जाहिरात
Read Time: 3 mins

BMC Election 2026: बृहन्‍मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ च्या अनुषंगाने उमेदवारी माघार घेण्‍याच्‍या मुदतीत म्‍हणजेच आज, शुक्रवार, दिनांक २ जानेवारी २०२६ रोजी २३ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांतून मिळून एकूण ४५३ नामनिर्देशन पत्रे माघार घेण्‍यात आली आहे. तर, १ हजार ७२९  उमेदवार निवडणूक लढविण्‍यास सज्‍ज आहेत. आज शनिवार, दिनांक ३ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजेपासून निवडणूक चिन्‍ह नेमून दिली जाणार आहेत. तसेच निवडणूक लढविणा-या उमेदवारांची अंतिम प्रसिद्ध केली जाणार आहे. 

२ हजार ५१६ नामनिर्देशन अर्ज दाखल

माननीय राज्‍य निवडणूक आयोग, महाराष्‍ट्र यांनी जाहीर केलेल्‍या महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ च्या कार्यक्रमानुसार, मंगळवार, दिनांक २३ डिसेंबर २०२५ ते मंगळवार, दिनांक ३० डिसेंबर २०२५ रोजीपर्यंत एकूण ११ हजार ३९१ नामनिर्देशनपत्रांचे वितरण झाले.  नामनिर्देशनपत्र स्‍वीकारण्‍याच्‍या अंतिम दिवसापर्यंत म्‍हणजेच मंगळवार, दिनांक ३० डिसेंबर २०२५ रोजी एकूण २ हजार ५१६ नामनिर्देशन अर्ज दाखल झाले. 

Advertisement

नवी मुंबईत किती उमेदवार रिंगणात? किती जणांनी अर्ज मागे घेतले? बेलापूर, वाशीसह संपूर्ण विभागाची A TO Z माहिती

प्राप्‍त २ हजार ५१६ नामनिर्देशनपत्रांची  बुधवार, दिनांक ३१ डिसेंबर २०२५ रोजी छाननी करण्‍यात आली. १६४ नामनिर्देशन पत्रे छाननीत अवैध ठरली. तर उर्वरित २ हजार १८५ नामनिर्देशन पत्रे वैध ठरली. नामनिर्देशन अर्थात उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आज शुक्रवार, दिनांक २ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ या कालावधीत होती. या निर्धारित कालावधीत ४५३ नामनिर्देशन पत्रे मागे घेण्‍यात आली. माघारीअंती स्‍पष्‍ट झालेल्‍या चित्रानुसार, १ हजार ७२९ उमेदवार निवडणूक लढविणार आहेत.

शनिवार दिनांक ३ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजेपासून उमेदवारांना निवडणूक चिन्‍ह नेमून देण्‍यात येणार आहे. चिन्‍ह वाटप पूर्ण झाल्‍यानंतर निवडणूक लढविणा-या उमेदवारांची अंतिम यादी शनिवार, दिनांक ३ जानेवारी २०२६ रोजी प्रसिद्ध करण्‍यात येणार आहे.

नक्की वाचा >> Pune News: भीमाशंकर मंदिरात संतापजनक प्रकार, पुणे शिवसेना जिल्हाप्रमुखाचा खळबळजनक CCTV व्हिडीओ व्हायरल

निवडणूक निर्णय कार्यालय / माघार घेतलेल्‍या नामनिर्देशन पत्रांची संख्‍या / निवडणूक लढविणा-या उमेदवारांची संख्‍या याची माहिती पुढीलप्रमाणे -

१) ए + बी + ई विभाग (RO २३) - १९ / ९२   

२) सी + डी विभाग (RO २२) - ०५ / ४४ 

3) एफ दक्षिण विभाग (RO २१ ) - २१ / ५०

४) जी दक्षिण विभाग (RO २०) - १४ / ५१

५) जी उत्‍तर विभाग (RO १९) - १८ / १०९

६) एफ उत्‍तर विभाग (RO १८) - २५ / ९३

७) एल विभाग (RO १७) - २० / ७६

८) एल विभाग (RO १६) -  २४ / ७४

९) एम पूर्व विभाग (RO १५) - ४१ / १२१

१०) एम पूर्व + एम पश्चिम (RO १४) - ४४ / ९७

११) एन विभाग (RO १३) - ३४ / ८८

१२) एस विभाग (RO १२) - १५ / ७०

१३) टी विभाग (RO ११) -  २४ /  ७९

१४) एच पूर्व विभाग (RO १०) -  २५/ ८७

१५) के पूर्व + एच पश्चिम विभाग (RO ९) - १२ / ५८

१६) के पश्चिम विभाग + के पूर्व (RO ८) - १८ / ८२

१७) के पश्चिम विभाग (RO ७) - १८ / १०४

१८) पी दक्षिण विभाग (RO ६) - १४ /  ५६

१९) पी पूर्व विभाग (RO ५) -  २१ / ८१

२०) पी उत्‍तर विभाग (RO ४) - ११ / ६०

२१) आर दक्षिण विभाग (RO ३) - १० / ८३

२२) आर मध्‍य विभाग (RO २) - ०७ / ३५

२३) आर उत्‍तर विभाग (RO १) - १३ / ३९

एकूण – ४५३/ १७२९